PNB Bank Fraud: पंजाब नॅशनल बँकेला 16 लाखांना गंडा, मडगाव येथील घटना

या प्रकरणात बँकेतील कर्मचारी गुंतले आहेत का याचा शोध सुरू
Margao Fraud Case
Margao Fraud CaseDainik Gomantak

PNB Bank Fraud: एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून अज्ञाताने पंजाब नॅशनल बँकेला 16.42 लाखांना गंडा घातला. याप्रकरणी बँकेने सायबर गुन्हे कक्षाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात बँकेतील कर्मचारी गुंतले आहेत का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सायबर गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी दिली.

Margao Fraud Case
Education Department: पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकार रेनकोटसाठीचे पैसे आता...

संशयिताने आपण स्वतः एका कंपनीचा संचालक असल्याचे पंजाब नॅशनल बँकेच्या पाजीफोंड - मडगाव येथील शाखेच्या कर्मचाऱ्याला सांगून फसविले. आपल्या या बँकेत खाते असून त्यातील रक्कम दुसऱ्या बँकेत आरटीजीएसने ट्रान्सफर करायची असल्याचे सांगितले.

बँक कर्मचाऱ्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व त्याने संशयिताने सांगितल्याप्रमाणे व दिलेल्या दुसऱ्या बँकेच्या खात्यावर सुमारे 16.42 लाख रुपये ट्रान्सफर केले.

हा व्यवहार आरटीजीएस पद्धतीने करण्यात आला. काही दिवसांनी या बँकेच्या शाखेत काही रकमेच्या हिशेबात तफावत आढळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com