Online Process Of RBI Assistant Recruitment starts, Know The Detailed Process Of Online Application And Important Dates:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नवीन नोकर भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून, बुधवार, 13 सप्टेंबर पासून सहाय्यक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
आरबीआय कडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वरून अर्ज करू शकतात.
या नोकर भरतीसाठी उमेदवारांना 4 ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यामध्ये सहाय्यक पदाच्या भरतीसाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात: 13 सप्टेंबर 2023 पासून
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन फी जमा करण्याची तारीख: 13 सप्टेंबर 2023
ऑनलाइन प्राथमिक परीक्षेची तारीख: 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन मुख्य परीक्षेची तारीख: 2 डिसेंबर 2023
मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. SC, ST आणि PWD उमेदवारांच्या बाबतीत, किमान गुणांची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी बॅचलर पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर रोजी किमान 20 वर्षे आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवारांचा जन्म 2 सप्टेंबर 1995 पूर्वी आणि 1 सप्टेंबर 2003 नंतर झालेला नसावा (दोन्ही तारखांसह) राखीव श्रेणीतील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट लागू आहे.
सहाय्यक पदासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेचे तीन भाग असतील, पहिली प्राथमिक परीक्षा, दुसरी मुख्य परीक्षा आणि तिसरी भाषा प्राविण्य परीक्षा.
RBI सहाय्यक 2023 ची ऑनलाइन प्राथमिक परीक्षा 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
ओपन, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 450 रुपये + 18% GST असे शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, माजी सैनिक आणि अपंग श्रेणीतील उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क रुपये 50 + 18% GST आहे. उमेदवारांना अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.