iPhone 15 Series Price In India And Apple Wanderlust Event:
Apple Wanderlust Event मध्ये iPhone 15 Series चे नुकतेच लॉंचिंग झाले. यामध्ये कंपनीने या सीरीजमधील फोन्सच्या किमती, कलर्स, स्पेसिफिकेशन्स या सर्वांचा खुलासा केला. यानंतर भारतातली आयफोन प्रेमींना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कारण iPhone 15 Series लॉंच होण्यापूर्वी याच्या किमती भरमसाठी असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
मात्र, कंपनीने लॉंचिंगदरम्यान जाहिर केलेल्या किमतीमुळे आयफोन प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या फोन्सच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
बर्याच प्रतीक्षेनंतर Apple ने iPhone 15 Series मंगळवारी लाँच केली आहे. याअंतर्गत 4 मॉडेल्स लाँच करण्यात आली आहेत. यामध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे.
iPhone 15 आणि iPhone 15 Plus हे बेस मॉडेल आहेत, ज्यांची फिचर्स समान आहेत. तर प्रो व्हेरियंटचे फीचर्सही जवळपास सारखेच आहेत. पण किंमत वेगळी आहे.
128 जीबी - 79,900 रुपये
256 जीबी - 89,900 रुपये
512 जीबी - 1,09,900 रुपये
कलर ऑप्शन
ब्लू, पिंक येलो, ग्रीन, ब्लैक
फोनची प्री-ऑर्डर 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे. मासिक EMI वर फोन 12,483 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
128 जीबी - रु 89,900
256 जीबी - रु 99,900
512 GB - रु 1,19,900
ब्लू, पिंक येलो, ग्रीन, ब्लैक
फोनची प्री-ऑर्डर 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे. मासिक EMI वर हा फोन 14,150 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
128 GB - रु 1,34,900
256 जीबी - रु 1,44,900
५१२ जीबी - रु 1,64,900
1 टीबी - रु 1,84,900
नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाईट टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम
या फोनचे प्री-बुकिंग १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे.
256 जीबी - रु 1,59,900
५१२ जीबी - रु 1,79,900
1 टीबी - रु 1,99,900
नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाईट टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम
प्रो मॅक्सची प्री-बुकिंग देखील 15 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर सेल 22 सप्टेंबरपासून सुरू होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.