Online Fraud Dainik Gomantak
अर्थविश्व

Online Fraud: पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली 31 लाखांची फसवणूक..., वाचा संपुर्ण प्रकरण

पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे.

Puja Bonkile

Online Fraud: ऑनलाइन फ्रॉडचे पुन्हा एक नवे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील व्यक्ती 58 वर्षीय व्यक्ती आहे. या व्यक्तीच्या एका छोट्याशा चुकीमुळे सुमारे 31 लाख रुपये गमावून बसला आहे. अलीकडे ऑनलाइन फ्रॉडचे प्रकरण वाढत चालले आहे. यासाठी फ्रॉडर अनेक नवनवे ट्रिक्स वापरत असतात.जसे की यूट्यूब व्हिडिओवर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करणे सर्वात सामान्य आहे. 

हा व्यक्ती 58 वर्षांचा असून तो विमा कंपनीत कर्मचारी आहे. पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून तो या फ्रॉडला बळी पडला आहे. यामध्ये फसवणुक झालेल्या व्यक्तीला युट्युब व्हिडिओ लाईक करण्याचे काम देण्यात आले होते.

  • Telegram Message ने फसवणुक सुरू

या फसवणूकीची सुरुवात एका टेलिग्राम मॅसेजने झाली. यामध्ये पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवण्यात आले होते. सेंडर्सने त्या व्यक्तीला जास्त इनकम होइल यासाठी पार्ट टाइम जॉब करण्याची ऑफर दिली होती. सेंडर्सशी बोलणे झाल्यावर त्या व्यक्तीने काम करण्यास होकार दिला.

  • आयुष्याची कमाई गमावली

त्या व्याक्तीला निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळाली होती. ही रक्कम त्याला कुठेतरी गुंतवायची होती. पण आयुष्यभराची कमाई ऑनलाइन फसवणुकीत लुटली जाईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती.

  • Youtube वर व्हिडिओ लाईक्स करायचे

सेंडरने त्या व्यक्तीला सांगितले की, पार्ट टाइम जॉब करताना काही व्हिडिओ शेअर केले जातील, त्यावर काही पैसे दिले जातील. यामुळे या आमिषाला बळी पडून हे काम करण्यास सुरूवात केली. यामध्ये एका टेलिग्राम नंबरवर लाईक्सचे स्क्रीनशॉट शेअर करायचे होते.

काही दिवसांनंतर फसवणूक करणाऱ्याने त्या व्यक्तीला आणखी पैसे कमवण्यासाठी 'Value Added Task' हा प्लॅन सांगितला. यादरम्यान त्या व्यक्तीचा विश्वास जिंकण्यासाठी ग्रुप अॅडमिनने संवाद साधला.तो व्यक्ती परत एका मोठ्या आमिषाला बळी पडला.

  • Crypto Wallet डाउनलोड केले

पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार त्या व्यक्तीला क्रिप्टो वॉलेट ओपन करण्यास सांगितले होते. यासाठी USDT विकत घ्यावे लागले, ज्याला Tether असेही म्हणतात. USDT एक क्रिप्टोकरन्सी नाणे आहे, ज्याचे मूल्य एक अमेरिकन डॉलर इतके आहे.

  • वॉलेटमधून रक्कम ट्रान्सफर झाली नाही

त्या व्यक्तीने फसवणुक करणाऱ्या लोकांनी जे सांगितले ते काम करत राहिला आणि अनेक कामे पूर्ण केली. यानंतर पैसे जमा होत आहे हे दिसत होते.पण बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाली नाही.

  • जास्त पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितले

यानंतर त्यांनी याबाबत चौकशी केली, त्यानंतर आणखी पैसे गुंतवावे लागतील, त्यानंतर रक्कम ट्रान्सफर करू, असे फसवणूक करणाऱ्या लोकांनी सांगितले. काही दिवसांनी, अचानक वॉलेट गायब झाले, जे त्या व्यक्तीने तयार केले होते. त्यानंतर टेलिग्राम अॅडमिनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकला नाही.

  • पोलिसांमध्ये एफआयआर नोंदवली

यानंतर फसवणुक झाल्याचे लक्षात येताच याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि तो ऑनलाइन फसवणुकीचा कसा बळी ठरला हे सांगितले. यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली. यानंतर पोलिसांनी 9 बँक अकाउंट फ्रीज केली असून त्यात सुमारे 20 लाख रुपये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT