NPCI signs agreement with UAE's Al Etihad Payments to facilitate real-time and cost-effective international transactions. Dainik Gomantak
अर्थविश्व

युएईतील 35 लाख भारतीयांची कटकट संपली, आता काही सेकंदात पाठवता येणार कुटुंबियांना पैसे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि NPCI यांच्या भारत आणि UAE मधील जलद पेमेंट सिस्टम (FPS) आणि द्विपक्षीय स्वीकृती जोडण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ UAE (CBUAE) सोबत अनेक वेळा बैठका झाल्या होत्या.

Ashutosh Masgaunde

NPCI signs agreement with UAE's Al Etihad Payments to facilitate real-time and cost-effective international transactions:

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने रिअल-टाइम आणि किफायतशीर आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी UAE च्या Al Etihad Payments सोबत करार केला.

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांच्या ग्राहकांना ते मोबाइल नंबरद्वारे जसा देशांतर्गत व्यवहार करतात तसाच त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहार करता येणार आहे.

भारत आणि UAE यांच्यात आधीच एक व्यापार करार आहे जो गेल्या वर्षी मे पासून लागू झाला आहे. RuPay प्रमाणेच, UAE मध्ये DCS च्या विकासामुळे तेथे डिजिटल व्यवहार आणि ई-कॉमर्सचा कल वाढेल.

यानंतर, दोन्ही देशातील ग्राहक आपापल्या कार्डाने एकमेकांच्या देशांमध्ये पेमेंट आणि खरेदी करू शकतील. एकदा DCS विकसित झाल्यानंतर, ते RuPay कार्डशी लिंक केले जाईल.

या कराराचा फायदा असा होईल की, UAE मध्ये राहणाऱ्या ३५ लाख भारतीयांना भारतात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना पैसे पाठवणे सोपे होणार आहे.

ग्राहक RuPay कार्डने UAE मध्ये पेमेंट करू शकतील आणि DCS सह भारतात पेमेंट करू शकता आणि ही कार्डे एकमेकांच्या देशात एटीएम, पॉइंट ऑफ सेल आणि ई-कॉमर्स व्यवहारांसाठी देखील वापरली जाऊ शकतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि NPCI हे भारत आणि UAE मधील जलद पेमेंट सिस्टम (FPS) आणि द्विपक्षीय स्वीकृती जोडण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ UAE (CBUAE) सोबत अनेक वेळा बैठका झाल्या होत्या.

RBI गव्हर्नर, शक्तीकांत दास आणि CBUAE चे गव्हर्नर खालेद मोहम्मद सालेम बालामा अल तमीमी यांच्यात या वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीसह या संदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, CBUAE ने जलद पेमेंट सिस्टम, कार्ड्स आणि मेसेजिंगच्या लिंकेजसाठी सहकार्याचा मसुदा समोर ठेवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

Goa IIT Project: 'आयआयटी' विरोधाला कोणाची तरी फूस! CM सावंतांचा आरोप; पुढच्या पिढीसाठी प्रकल्प गरजेचा असल्याचे स्पष्टीकरण

ED Raid Goa: गोव्यात ‘ईडी’ची मोठी कारवाई! अनेकांचे धाबे दणाणले, 12 ठिकाणी छापेमारी

Kushagra Jain Case: ..माझ्या मुलग्याचा मृत्यू झालाच कसा? 'कुशाग्र'च्या वडिलांनी लिहिले CM सावंतांना पत्र; विषबाधेचा संशय व्यक्त

Rashi Bhavishya 10 September 2025: कामात जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक व्यवहार जपून करा; महत्वाच्या निर्णयात घाई करू नका

SCROLL FOR NEXT