FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, ऐकून तुम्हीही व्हाल आनंदी!

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुन्हा एकदा भारतीयांना मोठी भेट दिली आहे.

Manish Jadhav

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुन्हा एकदा भारतीयांना मोठी भेट दिली आहे. तुम्हीही भारतात व्यवसाय करत असाल आणि तुमची कंपनी असेल तर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय कंपन्या आता थेट परदेशी स्टॉक एक्स्चेंजवर तसेच अहमदाबादमध्ये (Ahmedabad) असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रावर (IFSC) सूचीबद्ध केल्या जाऊ शकतात.

कोविड पॅकेज दरम्यान ही घोषणा करण्यात आली होती

सरकारने (Government) कोविड रिलीफ पॅकेज अंतर्गत या संदर्भात घोषणा केली होती, जी तीन वर्षांनंतर मंजूर झाली आहे. याद्वारे देशांतर्गत कंपन्यांना परदेशातील विविध स्टॉक एक्स्चेंजवर त्यांचे शेअर्स सूचीबद्ध करुन निधी उभारण्यास मदत होणार आहे.

या संदर्भातील प्रस्ताव पहिल्यांदा मे 2020 मध्ये महामारीच्या काळात जाहीर केलेल्या कोविड पॅकेज अंतर्गत आणण्यात आला होता.

सीतारामन म्हणाल्या - मी आनंदी आहे

सीतारामन यांनी पुढे सांगितले की, 'देशांतर्गत कंपन्या आता थेट परदेशातील विविध स्टॉक एक्स्चेंजवर त्यांचे शेअर्स सूचीबद्ध करुन निधी उभारु शकतात.' मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, सरकारने IFSC एक्सचेंजेसवर सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कंपन्यांच्या थेट सूचीकरणाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक मोठे पाऊल ठरेल

सीतारामन पुढे म्हणाल्या की, हे एक मोठे पाऊल आहे आणि यामुळे भारतीय कंपन्यांना अधिक चांगली मूल्यांकन सुविधा आणि जगभरातून भांडवल उभारता येईल.

कॉर्पोरेट बाँड मार्केटला बळकटी देण्यासाठी एएमसी रेपो सेटलमेंट आणि कॉर्पोरेट डेट मार्केट डेव्हलपमेंट फंडाच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

त्यांनी नियामक प्रभाव मूल्यांकनासाठी देखील आवाहन केले, जेणेकरुन नियंत्रित संस्था आणि बाजार त्यांच्या निर्णयांचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील.

सीतारामन पुढे म्हणाल्या की, सरकार शहरांना त्यांचे क्रेडिट रेटिंग सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, जेणेकरुन त्यांना त्यांच्या रोख्यांच्या चांगल्या किमती मिळू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT