FM Nirmala Sitharaman: करदात्यांवर अर्थमंत्री 'मेहरबान', आली नवी व्यवस्था; करचुकवेगिरी केल्यास...

Tax Payers: अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले पाहिजे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanDainik Gomantak

ITR Filing: तुम्हीही दरवर्षी आयकर भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रामाणिक करदात्यांचे कौतुक केले पाहिजे.

मात्र, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, काही लोक आयकर नियमांचा गैरवापर करत आयकर परताव्याचा दावा करत असल्याचे पुरावे आहेत.

शेल कंपन्यांचा निधी उघड झाला

डीप डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स (एआय टूल्स) वापरुन शेल कंपन्यांचा निधी शोधण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सीतारामन म्हणाल्या की, 'अशा परिस्थितीत जेव्हा शेल कंपन्यांकडे निधी गेल्याचे पुरावे तुमच्यासमोर असतील, तेव्हा CBDT किंवा CBIC गप्प बसू शकत नाही. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे जेणेकरुन करदात्यांचा विश्वास कायम राहील.'

Nirmala Sitharaman
FM Nirmala Sitharaman: पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

400 कोटी रुपये परतावा म्हणून मिळाले आहेत

उदाहरण देताना, अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, किमान पायाभूत सुविधांसह 50 चौरस मीटर क्षेत्रात 300 हून अधिक कंपन्या काम करत आहेत. पण त्यांना परतावा म्हणून 400 कोटी रुपये मिळतात.

पुढे, अमेरिकेतील बँकिंग संकटाबद्दल बोलताना सीतारामन म्हणाल्या की, भारताला (India) कोणताही धोका नाही. पण जर मंदी आली तर त्याचा परिणाम विविध क्षेत्रांच्या निर्यातीवर होऊ शकतो.

अर्जांवर वेळेवर कारवाई करावी

यापूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, 'CBDT ने करदात्यांच्या सर्व अर्जांवर वेळेवर कारवाई करावी. अर्ज निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. सीबीडीटीचा विस्तार करताना, करदात्यांना जागरुक करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.' पुढे त्यांनी करदात्यांची संख्या वाढविण्यावरही जोर दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com