MG Astor X, Morris Garages India
अर्थविश्व

MG Motors ने लाँच केला Astor चा नवा अवतार, कारमध्ये AI सह मिळणार ही 'खास' फिचर्स

Astor SUV: आता या कारमध्ये हवेशीर फ्रंट सीट, वायरलेस चार्जेस, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले आणि ऑटो डिमिंग IRVM इत्यादी फिचर्स देण्यात आली आहेत.

Ashutosh Masgaunde

MG Motors has launched a new Variant of Astor, the car will get 'special' features with AI:

ब्रिटिश ऑटोमोबाईल कंपनी MG Motors ने आपल्या SUV MG Astor ची नवी आवृत्ती लाँच केली आहे.

कंपनीने स्प्रिंट, शाइन, सिलेक्ट, शार्प प्रो आणि सॅव्ही प्रो या सर्व प्रकारांमध्ये AI फिचर दिले आहे. MG Astor ही मध्यम आकाराची एसयूव्ही कार आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 9.98 लाख रुपयांपासून सुरू होते.

एमजी मोटर इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता म्हणाले, 'आम्ही आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाची वाहने देण्यासाठी वचनबद्ध आहोत. या वचनाच्या अनुषंगाने आणि आमच्या ब्रँडला 100 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही Aster 2024 लाँच केली आहे.'

या वैशिष्ट्यांसह Aster 2024 लाँच

MG Aster 2024 मध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. आता यात हवेशीर फ्रंट सीट, वायरलेस चार्जेस, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले आणि ऑटो डिमिंग IRVM इत्यादी फिचर्स देण्यात आली आहेत.

कंपनीने सर्व प्रकारांमध्ये एडव्हान्स यूजर इंटरफेससह i-Smart 2.0 दिले आहे आणि ते 80 पेक्षा जास्त कनेक्टटेड फिचर्ससह येते.

यामध्ये जिओ व्हॉईस सिस्टीम देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे वाहन चालवण्याचा अनुभव चांगला येतो. याशिवाय, पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री सनराउंड कॅमेरा आणि लेव्हल 2 ADAS सारखी वैशिष्ट्ये देखील MG ने प्रदान दिली आहेत.

पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल नाही

MG Motors कडून Aster 2024 च्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.4 लीटर टर्बो पेट्रोल मोटर्स आहेत.

कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल, CVT आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिट प्रदान केले आहे. MG मोटर्सने 2021 मध्ये प्रथमच Astor लाँच केली होती. त्यावेळी त्याची एक्स-शोरूम किंमत 9.78 लाख रुपयांपासून सुरू होती. टाटा नेक्सन, महिंद्रा XUV700, Kia Seltos, Hyundai Creta, Skoda Kushaq सोबत या कारची स्पर्धा असल्याचे मानले जाते.

MG Astor 49 टॉप एंड सेफ्टी फीचर्ससह

MG Astor ही भारतातील पहिली SUV आहे, ज्यात वैयक्तिक AI असिस्टंट आणि 14 ऑटोनॉमस लेव्हल-2 फिचर्स आहेत, जी मध्यम श्रेणीतील रडार आणि मल्टीपर्पज कॅमेरासह कार्य करते.

यात प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम (ADS) आहे. कंपनीचा दावा आहे की MG Astor मध्ये 49 टॉप एंड सेफ्टी फीचर्स आहेत. नवीन MG Astor मध्ये MT, CVT आणि AT पर्यायांसह 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.3-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT