MG Comet EV: भारतीय बाजारपेठेत प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मोरिस गॅरेज(MG Motors) ने अधिकृतपणे आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार MG Comet EV बाजारपेठेत लाँच केली आहे. त्याचा लुक, बॉक्सी डिझाईन अतिशय जबरदस्त आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये आहे.
ही कार चार सिटर असुन दोन कारला दोन दरवाजे आहेत. अलीकडेच कंपनीने ही कार लाँच केली आहे. कंपनीने लाँच केलेली ही दुसरी इलेक्ट्रिक कार आहे, याआधी कंपनीने eZS लाँच केली होती. तुम्ही जर पणजीहुन कोल्हापुरला जाण्याचा विचार करत असाल स्वस्तात मस्त असी ही कार खरेदी करु शकता.
15 मे बुकिंग सुरु होणार बुकिंग
जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर 15 मे पासून बुकिंग सुरू होणार आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा डीलरशिपला भेट घेउन बुक करू शकता. तसेच कारची टेस्ट ड्राइव देखील 25 एप्रिलपासून सुरू झाली आहे. बुकिंगसोबतच त्याची डिलिव्हरीही मे महिन्यापासून सुरू होणार आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती सध्याच्या टाटा टियागो ईव्हीपेक्षा कमी किंमतीत लाँच करण्यात आली आहे.या कंपनीने फक्त 8.69 लाख रुपयांमध्ये लाँच केला आहे.
MG Comet EV चा लुक आणि डिझाइन
MG Comet EV चा लुक आणि डिझाईन खूप जबरदस्त आहे. कंपनीची ही कार इंडोनेशियन मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या Wuling Air EV चे रिबॅज केलेले व्हर्जन आहे. जी ब्रँडची मूळ कंपनी SAIC च्या GSEV प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. कंपनीने ही कार अनेक रंगांमध्ये लाँच केली आहे. ही कार आकाराने लहान असूनही, त्याचे बाह्य पार्टस जबरदस्त आहे.
कंपनीने याकारमध्ये अनेक फिचर्स दिले आहेत. यात LED हेडलॅम्प, LED टेल लाइट्स, डेटाइम रनिंग लाइट्स, दरवाज्यांवर क्रो हँडल आणि 12-इंच स्टील व्हील आहेत.
जे कारची साइड प्रोफाईल इमेज अधिक आकर्षक बनवते. इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, यात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करते. स्टीयरिंग व्हीलवर कंट्रोल बटणे दिलेली आहेत. कीलेस एंट्री, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल बाहेरील रिअर व्ह्यू मिरर, टिल्ट अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हील उपलब्ध आहेत.
MG Comet EV चे डाएमेंशन
MG Comet EV च्या डाएमेंशनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये त्याची लांबी: 2,974 मिमी, रुंदी: 1,505 मिमी, उंची: 1,631 मिमी, व्हीलबेस: 2010 मिमी आहे. तर 17.3kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जे 41bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करते. ही कार एका चार्जमध्ये 230 किलोमीटरपर्यंतची धावु शकते. या कारला चार्ज होण्यासाठी 7 तास लागतात. तसेच बॅटरी 5 तासात 80 टक्के चार्ज होते.
MG Comet EV कारचे फिचर
ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) देण्यात आले आहे.
रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स सीट बेल्ट रिमाइंडर
स्पीड अलर्ट सिस्टम
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
स्पीड सेन्सिंग डोअर लॉक
इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर-अनलॉक फंक्शन्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.