Meta layoffs 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Meta Layoffs 2026 Announcement: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी बातमी समोर आली.

Manish Jadhav

Mark Zuckerberg Company Fires 8000 Employees: जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी बातमी समोर आली. सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'मेटा' ने पुन्हा एकदा मंदीचे कारण पुढे करत आपल्या जागतिक मनुष्यबळातून तब्बल 8000 कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात नोकरीवरुन काढून टाकले.

विशेष म्हणजे, मेटाने गेल्या महिन्यातच नोकर कपातीचे संकेत दिले होते. कंपनीने आधी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर पहाटे 4 वाजता एक अधिकृत ईमेल पाठवून थेट नोकरीवरुन कमी केल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभावित कर्मचाऱ्यांना या कपातीबाबतचे वैयक्तिक ईमेल मिळण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये सिंगापूर येथील टीमला सर्वात आधी हा मोठा झटका बसला.

'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, मेटाने सिंगापूर (Singapore) हबमधील कर्मचाऱ्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता ईमेल पाठवून नोकरी संपल्याची माहिती दिली. जगातील वेगवेगळ्या टाइम झोननुसार इतर देशांतील कर्मचाऱ्यांनाही असेच ईमेल पाठवले जात आहेत. कपातीचा गोंधळ टाळण्यासाठी कंपनीने अमेरिका, ब्रिटन आणि इतर क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता आज घरुनच काम करण्यास सांगितले.

मेटाच्या चीफ पीपल ऑफिसर जेनेल गेल यांच्या एका मेमो नुसार, 8000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासोबतच कंपनी सुमारे 7000 कर्मचाऱ्यांना नवीन 'एआय-नेगेटिव्ह' टीममध्ये स्थानांतरित करणार आहे. सध्या मेटाचे संपूर्ण लक्ष लहान आणि अधिक प्रभावी टीम्स तयार करण्यावर केंद्रित असल्याने मॅनेजर्सची अनेक पदे रद्द करण्यात आली. या कपातीचा सर्वाधिक फटका इंजिनिअरिंग आणि प्रॉडक्ट टीम्सना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय कंपनीने विविध विभागांमधील जवळपास 6000 रिक्त पदे देखील कायमची संपुष्टात आणली.

मेटाने गेल्या महिन्यातच नोकर कपातीचे संकेत दिले होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आधीच असुरक्षिततेची भावना होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल याविषयी पुसटशीही कल्पना नव्हती. त्यातच आता कंपनी एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एक नवीन सॉफ्टवेअर वापरत असल्याचे समोर आले. हे सॉफ्टवेअर एआयला प्रशिक्षित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या माउसची हालचाल आणि त्यांच्या टायपिंगच्या गतीवर बारीक लक्ष ठेवते. या पाळत ठेवण्याच्या प्रकाराला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही ट्रॅकिंग सिस्टीम बंद करण्यासाठी एका पत्रकावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

गुगल आणि ओपनएआय सारख्या बड्या कंपन्यांना तगडी टक्कर देण्यासाठी मार्क जुकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील मेटा कंपनी चालू वर्षात एआय क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने जाहीर केल्यानुसार, या वर्षात 125 अब्ज ते 145 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे नियोजन असून, या बजेटचा एक खूप मोठा हिस्सा केवळ एआय तंत्रज्ञानाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT