देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या कारवर तगडी डिस्काऊंट ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यात विक्री वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सर्वाधिक डिस्काऊंट मारुती वॅगनआरवर दिला जात आहे. या मॉडेलवर तब्बल 1 लाखांचा डिस्काऊंट दिला जात आहे. मारुती हा डिस्काऊंट वॅगनआरच्या सर्व मॉडेल्सवर देत आहे, ज्यामध्ये सीएनजी आणि ऑटोमॅटिकचा समावेश आहे. ही कार टाटा टियागो आणि ह्युंदाई ग्रँड आय10 निओसशी स्पर्धा करते.
दरम्यान, मारुती सुझुकीच्या डिस्काऊंट ऑफरमध्ये 25,000 रुपयापर्यंतचा डिस्कांऊट दिला जात आहे. तसेच, 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदे दिले जात आहेत. कॉर्पोरेट बोनस 10,000 रुपयांपर्यंत आहे. एक्सचेंज आणि स्क्रॅपेज बोनस 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत आहे. काही निवडक व्हेरिएंटवर 1 लाखांपर्यंतची सूट दिली जात आहे. तथापि, सीएनजी मॉडेल्सवर ऑफर 95,000 रुपयांपर्यंत आहे. हा डिस्कांऊट शहर आणि डीलरनुसार बदलू शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून ऑफरबाबत माहिती घेऊ शकता.
मारुती वॅगनआरची एक्स-शोरुम किंमत सुमारे 5.55 लाखांपासून सुरु होते आणि 7.42 लाखांपर्यंत जाते. ही किंमत तिच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट आणि फीचर्सनुसार ठरवली जाते. ही कार दोन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 1.0 लिटर आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन. याशिवाय, सीएनजी व्हेरिएंटट देखील उपलब्ध आहे. पेट्रोल व्हर्जन 24 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते तर सीएनजी (CNG) व्हर्जन 34 किमी/किलो पर्यंत मायलेज देते.
वॅगनआरच्या बॉक्सी डिझाईनमुळे ती अधिक प्रशस्त बनते. उंची आणि मोठ्या विंडशील्डमुळे, कारमध्ये बसून बाहेर पाहणे अधिक आरामदायी वाटते. याशिवाय, कारमध्ये मोठी बूट स्पेस देखील आहे, जी लांब प्रवासात उपयुक्त ठरते. नव्या वॅगनआरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट, पॉवर विंडो, रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि ईबीडी सारखे सेफ्टी फीचर्स आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.