
Maruti Suzuki E Vitara Launch Booking Details India
मारुती सुझुकी ई विटारा भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाली आहे. यावर्षी ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच ती सादर करण्यात आली होती. कॉम्पॅक्ट साइज आणि मोठ्या स्पेसमुळे कार खूप लोकप्रिय झाली. सिटी ड्राइव्हसाठी ही कार एक मॉडेल ठरु शकते. दरम्यान, लॉन्चिंगबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, काही डीलरशिपवर बुकिंग सुरु झाले आहे. ही कार 25,000 रुपये टोकन रक्कम देऊन बुक केली जात आहे. परंतु आतापर्यंत कंपनीकडून बुकिंगबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, या शानदार कारची किंमत 16.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होऊ शकते. नवीन ई-विटारा नेक्सा ब्लू, ग्रे, सिल्व्हर, व्हाइट, रेड आणि ब्लॅक सिंगल-टोन कलरमध्ये उपलब्ध आहे. भारतात (India) ही कार हुंडई क्रेटा इलेक्ट्रिकला टक्कर देऊ शकते.
नवीन ई विटारामध्ये दोन बॅटरी पॅक असतील- एक 49 किलोवॅट तास आणि दुसरी 61 किलोवॅट तास बॅटरी पॅक, ज्यांची रेंज 500 किलोमीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार बॅटरी पॅक निवडू शकतात. ई विटारा गुजरात प्लांटमध्ये तयार करुन जपान आणि युरोपमध्ये निर्यात करण्यात येणार आहे.
नवीन eVitara चा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी असेल. याशिवाय, त्याची लांबी 4,275 मिमी, रुंदी 1,800 मिमी, उंची 1,635 मिमी, व्हीलबेस 2,700 मिमी आणि R18 एरोडायनामिक अलॉय व्हील्स कारमध्ये दिसतील. कारच्या फ्रंटमध्ये 3-पॉइंट मॅट्रिक्स एलईडी डीआरएल असतील. तर ड्रायव्हर सीट 10 प्रकारे एडजस्ट करता येईल. सुरक्षेसाठी कारमध्ये 7 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरे, लेव्हल-2 ADAS, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.