April 2025 Maruti Car Discounts Dainik Gomantak
अर्थविश्व

Car Discount: तुम्ही कार घेण्याचा विचार करताय? 'ही' कंपनी देतेय लाखोंचा डिस्काउंट

April 2025 Maruti Car Discounts: एप्रिल महिन्यात मारुती कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. एका कारवर तब्बल 1 लाखांचा डिस्काउंट दिला जात आहे.

Manish Jadhav

Maruti Suzuki Car Price Hike April 2025 Discount Offers

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या गाड्या मंगळवारपासून महाग झाल्या. गेल्या महिन्यातच कंपनीने 8 एप्रिलपासून कारच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती. यामुळे ग्रँड विटारासारख्या कारच्या किमती 62,000 रुपयांपर्यंत वाढणार आहेत. याचदरम्यान, एप्रिल महिन्यात मारुती कारवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. एका कारवर तब्बल 1 लाखांचा डिस्काउंट दिला जात आहे.

मारुती सुझुकी इंडिया एप्रिल 2025 मध्ये जिमनी, फ्रँक्स सारख्या छोट्या हॅचबॅक कार आणि एसयूव्हीवर मोठी सूट देत आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज फायदे आणि कॉर्पोरेट सवलतींसारख्या ऑफर समाविष्ट आहेत.

मारुती जिमनीवर एक लाखांचा डिस्काउंट

ऑटोकार इंडियाच्या एका बातमीनुसार, या महिन्यात तुम्हाला मारुती जिमनीवर तगडा डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही 5-डोरची मारुती 4X4 कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही खरेदी करणार असाल, तर तुम्हाला त्याच्या टॉप मॉडेलवर 1 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळेल. यावर कोणताही एक्सचेंज किंवा कॉर्पोरेट बोनस नाही. ही मारुती जिमनीच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत आहे. झेटा व्हेरिएंटची किंमत 12.75 लाख तर अल्फा व्हेरिएंटची किंमत 13.70 लाख एवढी आहे. त्यांच्या ऑटोमॅटिक मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 13.85 लाख आणि 14.80 लाखांपासून सुरु होते.

कोणत्या कारवर किती डिस्काउंट?

मारुती इनव्हिक्टो रु 1.40 लाखापर्यंत

मारुती ग्रँड विटारा 1.15 लाखापर्यंत

मारुती जिम्नी 1 लाखांपर्यंत

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सवर 93,000 हजारापर्यंत

मारुती इग्निसवर 60,000 हजारापर्यंत

मारुती बलेनो 50,000 हजारापर्यंत

मारुती XL6 वर 25,000 हजारापर्यंत

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. या वर्षी कंपनीने 20 लाखांहून अधिक कारचे उत्पादन केले आहे. त्याचवेळी, देशातून कार (Car) निर्यातीतही कंपनीने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मारुती सुझुकीने यावर्षी देशाबाहेर 3 लाखांहून अधिक कार निर्यात केल्या. कंपनीचा मोठा हिस्सा जपानच्या (Japan) सुझुकी मोटर कॉर्पोरेशनकडे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

Goa Live News: साळ येथील श्री महादेव भूमिका फंडपेटी वादप्रकरणी चौकशी लांबणीवर

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

SCROLL FOR NEXT