

America School Shooting: अमेरिकेतील ओरॅगन राज्यांतर्गत येणाऱ्या बेंड शहरातील एका प्राथमिक शाळेत हादरवून टाकणारी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात तीन लहान मुलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामध्ये शाळेतील एका शिक्षकाचाही समावेश आहे. या भीषण घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, हल्लेखोर तरुणही शाळेच्या आवारातच मृतावस्थेत आढळला. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले.
बेंड शहराचे पोलीस प्रमुख माईक क्रांट्ज़ यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, या दुर्देवी घटनेत जीव गमावलेल्या तीन मुलांचे वय अनुक्रमे 5, 8 आणि 11 वर्षे होते. याशिवाय, 7 वर्षांचा आणखी एक चिमुकला आणि 54 वर्षीय एक शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याचवेळी, हल्लेखोर हा याच परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याने शाळेच्या (School) बंद दरवाजांवर गोळीबार करत जबरदस्तीने आत प्रवेश केला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इमर्जन्सी नंबर 911 वर पहिला कॉल आला, ज्यामध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला जात असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिल्वर रेल एलिमेंट्री' या शाळेत हा गोळीबार झाला. पोर्टलॅंडपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत किंडरगार्टनपासून पाचवीपर्यंतची मुले शिक्षण घेतात. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा हल्लेखोर शाळेच्या आतच मृतावस्थेत आढळला; मात्र त्याला पोलिसांनी गोळी घातली की त्याने स्वतः आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.