Manish Jadhav
मारुती सुझुकीने सर्वात अॅडव्हान्स झेड सीरीज इंजिन पहिल्यांदा स्विफ्टमध्ये आणि नंतर डिझायरमध्ये सादर केले.
आता कंपनी त्यांच्या सर्वात लोकप्रिय कार वॅगन-आर मध्ये हे इंजिन समाविष्ट करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वॅगन-आर 17 जानेवारी रोजी ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाऊ शकते. परंतु अद्याप कंपनीकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती नवीन वॅगन-आर पूर्णपणे अपडेट करणार आहे. या कारच्या बाबतीत मागील काही महिन्यांपासून कोणतेही नवीन मोठे अपडेट आलेले नाही. मात्र नव्या अवतारात लॉन्च होणारी ही कार डिझाइनपासून इंटीरियरपर्यंत नवी दिसणार आहे.
सध्या, वॅगन आरची एक्स-शोरुम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरु होते. नवीन फीचर्स जोडल्यास या कारची किंमत वाढू शकते.
सध्याची वॅगनआर 1.0 लीटर आणि 1.2 लीटर इंजिनसह दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. परंतु सूत्रानुसार, नवीन वॅगन झेड सीरीज 1.2-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे चालवले जाईल. हे इंजिन 80 ते 82 पीएस पॉवर आणि 110 ते 112 एनएम पीक टॉर्क जनरेट करु शकते.
नवीन इंजिनसह, कारचे मायलेज 23-24 किमी प्रति लिटरपर्यंत जाऊ शकते. नवीन वॅगन-आरमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध असेल अशा बातम्या येत आहेत.
सुरक्षेसाठी, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ब्रेक असिस्ट, 3 पॉइंट सीट बेल्ट सारखी फिचर्स मिळू शकतात.