Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Goa Bungalow Sale Fraud Case: बंगले विक्री करण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची ९९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाळ्ळी येथे उघडकीस आला आहे.
Goa Bungalow Sale Fraud Case:
Bungalow Sale FraudDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: बंगले विक्री करण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची ९९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बाळ्ळी येथे उघडकीस आला आहे.

या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी लीना मेंडिस या संशयित महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.बाबू कोळेकर (६२) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ पासून आजपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला.

Goa Bungalow Sale Fraud Case:
Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

संशयित लीना मेंडिस ही नेरुल येथील रहिवासी असून, तिने कोळेकर यांना सुरुवातीला कोलोटा येथील एक बंगला स्वतःच्या मालकीचा असल्याचे सांगितले. हा बंगला विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून तिने त्यांच्याकडून ७५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com