anand mahindra

 

Dainikgomantak

अर्थविश्व

ती 'जीप' रस्त्यावर चालवू देणार नाही, बदल्यात बोलेरो देईन; आनंद महिंद्रा

ह्या व्यक्तीचे शिक्षण कमी असूनही आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 60 हजार रुपये खर्च करून हे अनोखे वाहन बनवले

दैनिक गोमन्तक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये एक माणूस भंगार साहित्यापासून बनवलेली चारचाकी (मॉडिफाईड जीप) चालवत आहे. त्या व्यक्तीचे टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. खुद्द आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीचे कौतुक केले आहे. हिस्टोरिकानो या यूट्यूब चॅनलनुसार, जंक मटेरिअलपासून मॉडिफाईड जीप बनवणारा माणूस हा महाराष्ट्रातील असून दत्तात्रेय लोहार असे त्याचे नाव आहे. ह्या व्यक्तीचे शिक्षण कमी असूनही आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 60 हजार रुपये खर्च करून हे अनोखे वाहन बनवले. जेव्हा आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, तेव्हापासून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिंद्राने शेअर केलेल्या 45 सेकंदांच्या क्लिपमध्ये दत्तात्रेय लोहार हे चारचाकी वाहन कसे चालवतात हे दाखवत आहेत. व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले- 'हे कोणत्याही नियमाशी जुळत नसले तरी, त्यांच्या कल्पकतेची आणि 'इच्छाशक्तीची ' प्रशंसा करणे कधीही सोडणार नाही.

महिंद्राने बोलेरो देण्याची ऑफर दिली

आनंद महिंद्रा (anand-mahindra) म्हणतात की - 'उद्या किंवा नंतर स्थानिक अधिकारी त्या व्यक्तीला वाहन चालवण्यापासून रोखतील कारण ते नियमांचे उल्लंघन करणारे वाहन आहे. या वाहनाच्या बदल्यात मी त्यांना वैयक्तिकरित्या बोलेरो देऊ करेन. असा उल्लेख देखील त्यांनी यात केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT