महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांकडून संकेत

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होऊ शकतात, असे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत
School 

School 

Dainik Gomantak

Published on
Updated on

ओमिक्रॉनचा धोका पाहता महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकदा बंद होऊ शकतात. महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित झालेले राज्य महाराष्ट्रात पुन्हा एकदा ओमिक्रॉनच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा शाळांना कुलूप लागणार आहेत, असे मानले जात आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास राज्यातील शाळा बंद होऊ शकतात.

<div class="paragraphs"><p>School&nbsp;</p></div>
शारीरिक संबंधानंतर लग्नास नकार देणं म्हणजे फसवणूक नाही : मुंबई उच्च न्यायालय

महाराष्ट्रातील शाळा (School) 1 डिसेंबरलाच सुरू झाले होत्या. गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या की, ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करू शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्रातील शहरी भागातील इयत्ता 5 ते 7 आणि ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांसाठी 1 डिसेंबरपासून वर्ग पुन्हा सुरू झाले आहेत. यापूर्वी 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील इयत्ता 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील इयत्ता 4 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू झाले आहेत.

मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन (Omicron) फॉर्मचे 11 नवीन रुग्ण आढळून आले, त्यामुळे या स्वरूपाच्या एकूण रुग्णांची संख्या 65 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आरोग्य विभागाने सांगितले की, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या अहवालानुसार राज्यात आणखी 11 जणांना कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

<div class="paragraphs"><p>School&nbsp;</p></div>
IIT बॉम्बेमधील सात विद्यार्थी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह !

मुंबई विमानतळावरील तपासणीदरम्यान आठ जणांना कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन फॉर्मची लागण झाल्याचे आढळून आले, तर नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉनची पुष्टी झाली आहे. मंगळवारी, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू संसर्गाची 825 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात ओमिक्रॉनच्या 11 प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय 14 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 66,50,965 झाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. मृतांचा आकडा 1,41,367 वर पोहोचला आहे.

सोमवारी, राज्यात संसर्गाची 544 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, परंतु त्यामध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही. याशिवाय चार रुग्णांचा मृत्यू झाला होता, जो 1 एप्रिल 2020 नंतरचा सर्वात कमी होता. मंगळवारी ओमिक्रॉनची 11 प्रकरणे समोर आल्यानंतर, या स्वरूपाच्या कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या 65 झाली आहे. राज्यातील 792 लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7,111 वर आली आहे. संसर्ग दर 2.12 टक्के एवढा आहे. सोमवारच्या संध्याकाळपासून आतापर्यंत 1,11,385 नमुने तपासण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 6,78,83,061 नमुने तपासण्यात आले आहेत. 64,98,807 लोक संसर्गातून बरे झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com