LPG cylinder became cheaper by ₹ 100 : तेल मार्केटींग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत 99.75 रुपयांनी कमी झाली आहे.
सूत्रांनी सांगितले की, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची दिल्लीत किरकोळ विक्रीची किंमत आजपासून 1,680 रुपयांवर गेली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 1 ऑगस्ट 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने आपल्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट केले आहेत.
जुलैमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये 7 रुपयांची किरकोळ वाढ झाली होती. मात्र, या महिन्यात 100 रुपयांची कपात करून मोठा दिलासा मिळाला आहे.
घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाच्या राजधानीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे. त्याच्या किंमतीतील शेवटचा बदल 1 मार्च 2023 रोजी झाला होता.
तीन वर्षांत त्याच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून सरकार त्यांना कधी दिलासा देणार, याकडे लोक प्रतीक्षा करत आहेत.
दिल्लीत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत: 1680 रुपये
कोलकातामध्ये रु. 1820.50
मुंबईत रु. 1640.50
चेन्नईमध्ये रु. 1852.50
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.