Goa Petrol-Diesel Price 1st August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात. मंगळवारी, 1 ऑगस्ट रोजी गोव्यातील इंधन दरांमध्ये किरकोळ बदल झाले.
दक्षिण गोव्यातील पेट्रोल आणि डीझेल दरामध्ये प्रतीलीटर काहीही बदल झाला नाही. हे दर सोमवार इतकेच राहिले. तर नॉर्थ गोवा आणि पणजी येथील पेट्रोल दरात प्रतीलीटर 0.06 पैसे तर डीझेल दरात 0.05 पैसे वाढ झाली.
गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 97.90
Panjim ₹ 97.90
South Goa ₹ 97.75
गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:
North Goa ₹ 90.39
Panjim ₹ 90.44
South Goa ₹ 90.29
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.
अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-
पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.