ITR Form Dainik Gomantak
अर्थविश्व

ITR फाइल करण्यासाठी शेवटची संधी; आतापर्यंत 6 कोटी करदात्यांनी भरला आयटीआर

ITR: पगारदार वर्ग आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशांसाठी, ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै म्हणजेच आज आहे.

Ashutosh Masgaunde

ITR Filing Due Date: रविवार संध्याकाळपर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी सहा कोटींहून अधिक प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरले गेले आहेत.

या आकड्याने गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत दाखल केलेल्या आयटीआरचा आकडा ओलांडला आहे.

पगारदार वर्ग आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही अशांसाठी, ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै म्हणजेच आज आहे.

प्राप्तिकर विभागाने ट्विट केले की, "३० जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले, त्यापैकी २६.७६ लाख आयटीआर रविवारी दाखल झाले." आयटीआर भरण्यासाठी करदात्यांना फोन, लाइव्ह चॅट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत मदत केली जात असल्याचे विभागाने म्हटले आहे.

आज शेवटची मुदत

आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 (AY 2023-24) साठी ITR दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

त्यामुळे आयटीआर भरण्याची मुदत आणखी वाढेल, अशी आशा करदाते व्यक्त करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

एवढेच नाही तर आयटीआर भरण्याची शेवटची तारीखही वाढवली जाणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. अशा परिस्थितीत जे आज आयटीआर दाखल करू शकत नाहीत, त्यांना उद्यापासून आयटीआर भरण्यासाठी दंड भरावा लागेल.

दंड

आयटीआर उशीरा भरताना दंड वेतनानुसार आकारला जातो. 31 डिसेंबर 2023 पर्यंत ITR भरता येईल आणि कमाल 5000 रुपये दंड भरावा लागेल.

ज्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसेल त्यांना विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील. त्याचवेळी यापेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना ५००० रुपये भरावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Socorro: मान्सूनच्या आगमनापासून वेगवेगळे रंग धारण करणारे 'सुकूर पठार'

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

SCROLL FOR NEXT