ITR Filing साठी करत्यांकडे उरला केवळ 1 दिवस; 31 जुलैची डेडलाईन

आतापर्यंत 5.84 कोटी आयकर रिटर्न भरले
ITR Filing
ITR FilingDainik Gomantak
Published on
Updated on

ITR Filing News: पगारदार वर्ग आणि लोकांसाठी ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. 31 जुलै ही ITR भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने अनेक नागरीक टॅक्स रिटर्न वेगाने भरत आहेत.

आयकर विभाग आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दररोज अपडेट देत आहे. त्यानुसार आतापर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 5.83 कोटी ITR दाखल करण्यात आले आहेत.

ITR Filing
Drunk Tourist in Goa: पेडण्यातील कोरगाव येथे मद्यधुंद पर्यटकांचा गोंधळ; पोलिसांना अरेरावी

आयकर विभागाने ट्विट केले की, "30 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 5.83 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत, जे गेल्या वर्षी 31 जुलैपर्यंत दाखल केलेल्या आयटीआरच्या आकड्यापेक्षा जास्त आहेत."

एका तासात 3.04 लाख ITR दाखल केले

आयकर विभागाने सांगितले की आज दुपारी 1 वाजेपर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर 46 लाखांहून अधिक यशस्वी 'लॉगिन' केले गेले आहेत. शनिवारी 1.78 कोटी यशस्वी 'लॉग इन' झाले.

विभागाने दुपारी 2.03 वाजता ट्विट केले, "आज दुपारी 1 वाजेपर्यंत 10.39 लाख आयटीआर दाखल केले गेले आहेत, त्यापैकी 3.04 लाख आयटीआर फक्त गेल्या एका तासात दाखल झाले आहेत."

ITR Filing
PMSBY: केवळ 20 रूपयात 2 लाखांचा विमा; जाणून घ्या या सरकारी योजनेची खास वैशिष्ट्ये

इतके असेल विलंब शुल्क

31 जुलैनंतर आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली तर त्याला उशिरा दंड म्हणून 5,000 रुपये भरावे लागतील. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला विलंब शुल्क म्हणून 1,000 रुपये भरावे लागतील.

हेल्पलाईन

आयकर विभागाने यापुर्वीच सांगितले की आमचा हेल्पडेस्क करदात्यांना मदत करण्यासाठी 24x7 कार्यरत आहे. हे लोकांना आयटीआर फाइल करण्यापासून ते कर भरण्यापर्यंतच्या सेवांसाठी मदत करत आहे. हेल्प डेस्क कॉल, लाइव्ह चॅट, वेबेक्स सत्र आणि सोशल मीडियाद्वारे मदत करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com