Income Tax New Rules for ITR-1 filing Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Income Tax New Rules: नोकरदार करदाते आणि छोट्या गुंतवणूकदारांसाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि सुटसुटीत झाली.

Manish Jadhav

Income Tax New Rules: नोकरदार करदाते आणि छोट्या गुंतवणूकदारांसाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि सुटसुटीत झाली. 2026-27 साठी सरकारने सर्वात सोपा मानल्या जाणाऱ्या 'ITR-1' फॉर्मची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली. आतापर्यंत शेअर बाजारातून किंवा म्युच्युअल फंडातून किरकोळ नफा मिळवणाऱ्यांना क्लिष्ट असा 'ITR-2' फॉर्म भरावा लागत असे. परंतु, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) नवीन नियमांमुळे लाखो करदात्यांची या त्रासातून मुक्तता झाली असून, त्यांना एक मोठा ऐतिहासिक दिलासा मिळाला.

या नवीन बदलांनुसार, आतापर्यंत शेअर किंवा इक्विटी म्युच्युअल फंडातून केवळ एक रुपयाचाही दीर्घकालीन भांडवली नफा झाल्यास आयटीआर-1 फॉर्म अपात्र ठरत होता. मात्र, आता नव्या नियमांनुसार, जर तुम्हाला आर्थिक वर्षात 1.25 लाख रुपयांपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली नफा झाला असेल, तरीही तुम्ही सहजपणे आयटीआर-1 फॉर्म निवडू शकता. दुसरा मोठा बदल म्हणजे, पूर्वी फक्त एकाच घराची मालकी असलेले लोक हा फॉर्म भरु शकत होते.

आता जर तुमच्याकडे दोन घरे असतील (उदा. एक राहते घर आणि दुसरे मूळ गावी असलेले घर), तरीही तुम्ही या वर्षापासून आयटीआर-1 फॉर्म भरण्यासाठी पूर्णपणे पात्र ठरणार आहात. या दोन मोठ्या सवलतींमुळे नोकरदार वर्गाचा फॉर्म भरताना होणारा गोंधळ आणि वेळ दोन्ही वाचणार आहे.

तथापि, कर तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अजूनही आयटीआर-2 फॉर्म भरणे अनिवार्य असेल. जर तुम्ही वर्षभरात शेअर्सची खरेदी-विक्री करुन अल्पकालीन नफा (STCG) कमावला असेल, किंवा तुमचा दीर्घकालीन नफा 1.25 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला आयटीआर-1 चा लाभ घेता येणार नाही. याशिवाय, शेअर बाजारातील (Stock Market) तोटा पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करायचा असल्यास, किंवा तुमची एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर-2 चाच वापर करावा लागेल.

तसेच, जमीन, सोने किंवा घर विकून झालेला भांडवली नफा आणि एखाद्या कंपनीत संचालक (Director) पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींना आयटीआर-1 च्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले. कर विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील मध्यमवर्गीय आणि छोट्या गुंतवणूकदारांना मात्र प्राधान्याने दिलासा मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT