Income Tax Goa: लोकसभा निवडणुकीत पैसे, भेटवस्तू वाटप होतेय? लगेच तक्रार करा; पणजीत आयकर विभागाचा नियंत्रण कक्ष

Income Tax Control Room In Goa: बेकायदेशीरपणे पैसे किंवा भेटवस्तू वाटप रोखण्यासाठी गोव्यात आयकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन
Income Tax Control Room In Goa
Income Tax Control Room In Goa

Income Tax Control Room In Goa

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यातील विविध तपासणी नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी केली जातेय, तर प्रशासकीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गैरप्रकार होण्याची शक्यता असते. यामध्ये बेकायदेशीरपणे पैसे किंवा भेटवस्तू वाटप केले जाते. याला रोखण्यासाठी गोव्यात आयकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

आयकर विभागाने पणजीत नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. पणजी-गोवा येथे आयकर विभागाने लोकसभा निवडणूक २०२४ कार्यक्रम समाप्त होईपर्यंत नियंत्रण कक्ष कार्यरत केल्याचे म्हटले आहे.

पैसे वाटप, भेटवस्तू वितरण यासारख्या गोष्टींबाबत आयकर विभागाकडे तात्काळ तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही विभागाने सार्वजनिक केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Income Tax Control Room In Goa
Valpoi News : ठाणे माध्यमिक विद्यालयाला सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन प्रदान

तक्रार करण्यासाठी आयकर विभागाने टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल प्रसिद्ध केला आहे.

टोल फ्री क्रमांक - 1800-233-3941

लँडलाईन क्रमांक - 0832-2438447

ई-मेल - goaelections@incometax.gov.in

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com