Trade  Dai
अर्थविश्व

Trade Deficit: भारताचा व्यापारात तोटा, मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पट घट

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा व्यापारात घाटा झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. जुलै महिन्यातील भारताची व्यापार तूट 31.02 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. हा आकडा मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील आकडेवारीपेक्षा तिप्पट आहे. जून महिन्यात भारताची व्यापार तूट 26.18 डॉलर अब्ज होती. अर्थ मंत्रालयाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

जुलै महिन्यात भारताची आयात वाढून 66.26 अब्ज डॉलर झाली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 46.15 अब्ज डॉलर होती. तर, जुलैमध्ये देशाची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 35.24 अब्ज डॉलर इतकी होती.

भारताची व्यापार तूट एप्रिल-जुलैच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच चालू आर्थिक वर्षात 100.01 अब्ज डॉलर झाली आहे, जी आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत नोंदवलेल्या 42.07 अब्ज डॉलर पेक्षा अधिक आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताची व्यापारी निर्यात एकूण 429.2 अब्ज डॉलर राहिली आहे. व्यापाराच्या आकडेवारीचा तपशील देताना, वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, "आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत, 156.41 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. यातून चालू आर्थिक वर्षात आम्ही 470 अब्ज डॉलर निर्यात लक्ष गाठण्याच्या मार्गावर आपण आहोत असे दिसते."

रूपयाची विक्रमी घसरण

भारतीय रूपयाची अमेरिके डॉलरच्या तुलनेत विक्रमी घसरण झाली आहे. जुलै महिन्यात भारतीय रूपयाने 80 चा टप्पा पार केला. भारताने गहू, लोखंड, पोलाद आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर निर्बंध लादले त्यामुळे निर्यातीवर मर्यादा आल्या. जूनच्या तुलनेत जुलैच्या व्यापारी मालाच्या निर्यातीत 12 टक्क्यांनी मोठी घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT