Valpoi News: श्री हनुमान विद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांना साईकल प्रदान

स्माईल फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे गोव्यातील एकमेव शाळेला मिळाला मान
Valpoi  News
Valpoi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: स्माईल फाउंडेशन ऑफ इंड़िया आणि पेपसीको संघटना यांच्या विद्यमानाने वाळपई शिक्षण संस्था संचालिक श्री हनुमान विद्यालय वाळपई या शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांना साईकल प्रदान करण्यात आला. नुकतेच पणजी येथील ताज हॉटेलच्या सहभागृहात संपन्न झालेल्या खास एका कार्यक्रमात मुलांना साईकल वितरीत करण्यात आल्या आहेत.

(Provided bicycles to 50 children at Sri Hanuman Vidyalaya at Valpoi)

Valpoi  News
Mhadai River बाबत कर्नाटककडून अवमान; तरी ही मुख्यमंत्र्यांचे मौन बधिर करणारे: विजय सरदेसाई

स्माईल फाऊंडेशन ऑफ इंड़िया ही संस्था देशभरातील गरजू विद्यार्थी, विधवा महिला, दारिद्र्य रेषेतील मुले, आदीवासी मुले, अनाथ मुले, तसेच ज्या मुलांना शिक्षणासाठी लागणारा खर्च त्यांचे पालन पोषण अशा विविध सुविधा ही संस्था पुरवित असते. ह्या संस्थेचा उद्देश मुलांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरविणे. ही संस्था ग्रामीण भागात जास्त वावरत असते. त्यामुळे त्यांनी गोव्यातील वाळपई येथील एकमेव शाळा निवडलेली आहे.

Valpoi  News
Burning Car: चालत्या कारने घेतला पेट; जीवितहानी नाही

गेल्या दोन वर्षापासून स्माईल फाऊंडेशने श्री हनुमान विद्यालयाला विविध सुविधा पुरविल्या आहे. गेल्या वर्षी त्यांनी विज्ञान लेब मध्ये कपाटे, टेबल तसेच इतर लेब मध्ये अत्यंत आवश्यक असणारे साहित्य दिले आहेत.यंदा त्यांनी त्याच शाळेतील 50 मुलांना काल पणजी येथील ताज हॉटेलमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करुन मुलांना सायकली वितरीत करण्यात आला.यावेळी स्माईल फाऊंडेशनचे अधिकारी विजय बसक उपस्थित होते. तसेच पेपसीको इंडियाचे 500 जण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

विजय बसक यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले, की आजच्या अत्याधुनिक युगात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे परिसर प्रदुषित झाला आहे. सायकल देऊन काही प्रमाणात आजुबाजुचे परिसर प्रदुषण मुक्त होण्यासाठी फायदेशीर होईल. सायकल मुळे मुलांचा व्यायम होऊन ती तंदूरुस्त होणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही ग्रामीण भागात जाऊन शाळेतील, मुलांची परिस्थिती परताळून सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा चालू असतो. गोव्यातील तुमची शाळा आम्हाला आवडली त्यामुळे आम्ही ही शाळा निवडलेली आहे .ह्या सायकल गरजू मुलांना देऊन समाजात काही प्रमाणात आमचा हातभार लागणार आहे. त्यामुळे ह्या सायकलचा पुरेपुर उपयोग करा असे विजय म्हणाले.

यावेळी वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरहरी हदणकर, व्यवस्थापक देवेश पेडणेकर, संस्थेचे पदाधिकारी सदाशिव वेलिंगकर, शाळेच्या प्रभागी सुविधा बर्वे, कल्पना बोर्येकर, दिलीप म्हादोळकर आदींची उपस्थिती होती.वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरहरी हळदणकर यांनी स्माईल फाऊंडेशने सायकल दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. व ह्या सायकलचा पुरेपुर फायदा मुलांना होईल असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com