IOC कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 6,360.05 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. Dainik Gomantak
अर्थविश्व

सामान्यांच्या खिशाला कात्रीलावून, देशातील सर्वात मोठी तेल कंपनी मालामाल

IOC ने कळवले आहे की, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत सुमारे 6.93 रुपये प्रति शेअर नफा कमावला आहे. एकूण नफा जोडल्यास, हा निव्वळ नफा 6,360.05 कोटी इतका होतो.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी तेल कंपनी (Oil company) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) (IOC) ने त्यांना या तिमाहीमध्ये किती नफा झाला आहे ते स्पष्ट केले आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्यांच्या नफ्यात किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीने या नफ्याचे श्रेय त्यांच्या उत्कृष्ट ऑपरेशनल कामगिरीला दिले आहे. कंपनीला दुसऱ्या तिमाहीत 6,360.05 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

IOC ने कळवले आहे की, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत सुमारे 6.93 रुपये प्रति शेअर नफा कमावला आहे. एकूण नफा जोडल्यास, हा निव्वळ नफा 6,360.05 कोटी इतका होतो. हा नफा जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 6,227.31 कोटी नफा झाला होता. त्यावेळी प्रति शेअर 6.78 रुपये नफा होता. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने स्टॉक एक्स्चेंजवर दिलेल्या फाइलिंगनुसार ही माहिती समोर आली आहे.

आर्थिक सुधारणेची चिन्हे

IOC ने यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत 5,941.37 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. यावेळी नफ्याचा दर किरकोळ आहे, कारण इन्व्हेंटरी नफा कमी नोंदवला गेला आहे. तर गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत इन्व्हेंटरीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे कंपनीचा नफाही चांगला वाढला होता. जेव्हा कंपनी कच्च्या तेलासारखा माल निश्चित दराने खरेदी करते तेव्हा कंपनीचा इन्व्हेंटरी नफा अधिक वाढतो. नंतर या कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेल बनवले जाते. सध्या कच्च्या तेलाची खरेदी महाग होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलही महाग झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत साठा नफा कमी झाला आहे.

किती उत्पन्न वाढले

IOC च्या मते, कंपनीने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत 190 लाख टन इंधनाची विक्री केली आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 177 लाख टन अधिक आहे. कोविड लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. त्यानुसार तेलाची मागणीही झपाट्याने वाढत आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रिफायनरींनी सुमारे 1.5 दशलक्ष टन कच्च्या तेलाचे इंधनात रूपांतर केले. गेल्या वर्षी ते 130 लाख टनांपेक्षा जास्त होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे IOC च्या उत्पन्नातही 46% वाढ झाली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमहीत ऑपरेशनल परफॉर्मन्सही 50 टक्क्यांनी वाढला आहे.

भागधारकांना दिवाळी भेट

IOC त्यांच्या मते, बोर्डाने प्रति शेअर अंतरिम लाभांश 50 टक्के किंवा प्रति शेअर 5 रुपये वाढवण्यास मान्यता दिली आहे. 2021-22 साठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा निव्वळ नफा 51 टक्क्यांनी वाढून 12,301.42 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने एप्रिल ते सप्टेंबर सहामाहीत 3.24 लाख कोटी रुपये कमावले. जे गेल्या वर्षीच्या 2.04 लाख कोटींपेक्षा 51% अधिक होते. आकडेवारीनुसार, आयओसीने कच्च्या तेलाचे पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनात रूपांतर करून प्रति बॅरल सुमारे 6.57 डॉलर कमावले. हा आकडा अंदाजे 500 रुपये इतका आहे.

पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त, IOC LPG देखील विकते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे इंधन विक्रीवर मोठा परिणाम झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतर विक्रीत सातत्याने सुधारणा होत आहे. एप्रिल ते सप्टेंबरमधील कंपनीच्या चांगल्या कमाईवरून हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता इंधनाची मागणी पूर्णपणे रुळावर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT