Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेने बदलले नियम, अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा; आता फक्त हेच लोक...

Indian Railways Update: मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांना लोअर बर्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

Indian Railways Update: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठी सुविधा सुरु करण्यात आली आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला रेल्वेकडून मोठा फायदा मिळणार आहे.

प्रवाशांचा (Passengers) प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने विशेष निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांना लोअर बर्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच शारीरिकदृष्ट्या विकलांग लोकांसोबत प्रवास करणाऱ्या लोकांनाही लोअर बर्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वृद्धांनाही सुविधा मिळणार आहे

यासोबतच रेल्वेने वृद्ध आणि महिलांसाठी (Women) लोअर बर्थची सुविधाही सुरु केली आहे. रेल्वे बोर्डाने आदेश जारी करुन ही माहिती दिली आहे. रेल्वेने 31 मार्च रोजी वेगवेगळ्या झोनसाठी आदेश जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

रेल्वेने आदेश जारी केला

रेल्वेने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, स्लीपर क्लासमध्ये चार जागा, AC3 कोचमध्ये दोन जागा, AC3 (इकॉनॉमी) कोचमध्ये दोन जागा शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती आणि त्यांच्या परिचरांसाठी राखीव असेल.

पूर्ण भाडे द्यावे लागेल

यासोबतच गरीब रथ ट्रेनमध्ये अपंगांसाठी 2 लोअर बर्थ आणि 2 अपर सीट आरक्षित करण्याची तरतूद असल्याचे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. मात्र, या सुविधेसाठी या लोकांना पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर 'एसी चेअर कार' ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी दोन जागा राखीव असतील.

गर्भवती महिलांनाही ही सुविधा मिळते

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांसाठी स्लीपर श्रेणीमध्ये 6 लोअर बर्थ राखीव आहेत. यासोबतच, 3AC मध्ये प्रत्येक कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ, 2AC मध्ये प्रत्येक डब्यात तीन ते चार लोअर बर्थ ठेवण्यात आले आहेत.

फक्त गरोदर महिलांनाच सुविधा मिळते

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्लीपर क्लासमध्ये 6 लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय, 3AC मध्ये प्रत्येक डब्यात चार ते पाच लोअर बर्थ, 2AC मध्ये प्रत्येक डब्यात तीन ते चार लोअर बर्थ ठेवण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: म्हापशात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत 8 दुकाने आणि फ्लॅट फोडला; लाखोंचा मुद्देमाल लंपास

Goa Ujjwala Scheme: गोमंतकीयांसाठी खुशखबर! गुरुवारपर्यंत सिलिंडरचे पैसे खात्यात; 2.50 लाख कुटुंबांना मिळणार लाभ

Viral Video: दारूच्या नशेत फ्लायओव्हरच्या छतावर चढला, डोळे मिटले अन्... थरारक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT