Indian Railways: अश्विनी वैष्णव यांचा धक्कादायक निर्णय, बंद झाली 'ही' जुनी व्यवस्था!

IRCTC: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक नवे निर्णय घेतले आहेत.
Ashwini Vaishnav
Ashwini VaishnavDainik Gomantak

IRCTC: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक नवे निर्णय घेतले आहेत. यातील अनेक निर्णय प्रवाशांच्या हिताचे आहेत, तर अनेक निर्णय कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहेत.

रेल्वेमंत्र्यांच्या काही निर्णयांमुळे प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रेल्वेमंत्र्यांनी यापूर्वीही असा निर्णय घेतला असून, त्यात त्यांनी रेल्वेतील वर्षानुवर्षे चालत आलेली सरंजामी व्यवस्था संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरातील रेल्वे जीए कार्यालयात आरपीएफ जवान तैनात आहेत. या जवानाचे काम फक्त सलामी देणे एवढेच आहे.

विशेष गणवेशात जवान तैनात होता

इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा रेल्वेत सुरु आहे. मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी ही सरंजामी प्रथा मानून ती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वेचे उच्च अधिकारी सलामीला स्टेटसशी जोडतात. खरे तर रेल्वे मंत्रालयात रेल्वे मंत्री आणि बोर्ड मेंबरसाठी स्वतंत्र गेट आहे, ज्यावर सलामी देणारा आरपीएफ जवान खास गणवेशात तैनात असतो.

Ashwini Vaishnav
Indian Railways: उद्या 'या' रुटवर धावणार वंदे भारत, PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

सवलत पुन्हा सुरु होऊ शकते

ही प्रणाली रेल्वेच्या सर्व झोन कार्यालयांमध्ये सुरु होती, परंतु ती आता तात्काळ प्रभावाने रद्द केली आहे. दुसरीकडे, भारतीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) तिकिटांवर दिलेली सवलत पुन्हा सुरु करण्याचा विचार केला जात आहे. ही सूट पूर्ववत न केल्यामुळे रेल्वेला यापूर्वी टीकेला सामोरे जावे लागले होते.

Ashwini Vaishnav
Indian Railways: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमंत्र्यांनी दिलं मोठं गिफ्ट, ट्रेनमध्ये 'या' सुविधा...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे (Railway) तिकिटाच्या दरात पुन्हा सवलत देण्यासाठी वयोमर्यादेचे निकष बदलू शकते. सरकार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सवलतीच्या भाड्याची सुविधा देईल अशी अपेक्षा आहे. यापूर्वी ही सुविधा 58 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिला आणि 60 वर्षे पूर्ण करणाऱ्या पुरुषांसाठी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com