Indian Railways: रेल्वेसाठी पहिल्यांदाच आली खूशखबर, आता ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीबाबत होणार निर्णय!

Senior Citizen Ticket Concession: भारतीय रेल्वे वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेत असते. मागील आर्थिक वर्ष रेल्वेच्या दृष्टिकोनातून अनेक अर्थांनी विशेष होते.
Indian Railways
Indian RailwaysDainik Gomantak

Senior Citizen Ticket Concession: भारतीय रेल्वे वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेत असते. मागील आर्थिक वर्ष रेल्वेच्या दृष्टिकोनातून अनेक अर्थांनी विशेष होते.

यादरम्यान प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आठ वंदे भारत गाड्या वेगवेगळ्या मार्गावर सुरु करण्यात आल्या. याशिवाय प्रवासी भाडे आणि मालवाहतुकीच्या महसुलातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

या क्रमाने, महसुलात सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दक्षिण रेल्वेकडून देण्यात आली. 2022-23 या आर्थिक वर्षात प्रवासी विभागात ते 6,345 कोटी रुपये होते. हा आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे.

2022-2023 मध्ये 64 कोटी प्रवाशांनी प्रवास केला

गेल्या आर्थिक वर्षात दक्षिण रेल्वेने 3,539.77 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. यापूर्वी, 2019-20 या आर्थिक वर्षात दक्षिण रेल्वेने सर्वाधिक 5,225 कोटी रुपये कमावले होते.

दक्षिण रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत प्रकाशनात असे म्हटले आहे की, 2022-2023 मध्ये सुमारे 64 कोटी प्रवाशांनी प्रवास केला. हे 2021-22 च्या 34 कोटी प्रवाशांच्या (Passengers) तुलनेत 88.5 टक्के अधिक आहे.

Indian Railways
Indian Railway : उन्हाळ्यात मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

सूट पूर्ववत करण्याची मागणी

मालवाहतूक क्षेत्रातही दक्षिण रेल्वेने यश संपादन केले आहे. यामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक 4.05 मेट्रिक टन कार्गो लोडिंग, 5.2 मेट्रिक टन पेट्रोलियम आणि 3.23 मेट्रिक टन अन्नधान्याचे सर्वाधिक लोडिंग समाविष्ट आहे. रेल्वेच्या प्रचंड कमाईनंतर ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) तिकिटावर देण्यात आलेली सवलत पुन्हा बहाल करण्याची मागणी होत आहे.

Indian Railways
Indian Railways: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात मिळणार सवलत! रेल्वेमंत्र्यांनी सांगितला नवा नियम

तसेच, मार्च 2020 मध्ये कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात दिलेली सूट रेल्वेने बंद केली होती.

रेल्वेने सर्व सुविधा नियमित केल्यानंतरही प्रवासी भाड्यातील सवलत पुन्हा सुरु झालेली नाही. ही सुविधा पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून सातत्याने होत आहे.

यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, रेल्वेकडून प्रवाशांना आधीच 55 टक्के सवलत दिली जात आहे. मात्र आता महसुलात वाढ झाल्यामुळे भाड्यातील सूट पुन्हा सुरु होण्याची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com