Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी भेट, आता ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये मिळणार 'ही' सवलत!

Indian Railways Ticket Concession: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे.

Manish Jadhav

Indian Railways Ticket Concession: तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापुढे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक विशेष सुविधा मिळणार आहेत.

रेल्वेकडून माहिती देताना सांगण्यात आले की, विभागाकडून दररोज सुमारे 10,000 गाड्या चालवल्या जातात, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासह प्रत्येकाला विशेष सुविधा दिल्या जातात.

ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा मिळत आहे

माहिती देताना अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये कन्फर्म लोअर बर्थची सुविधा मिळत आहे. त्यासाठी रेल्वेमध्ये वेगळी तरतूद आहे. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला प्रवाशांना लोअर बर्थसाठी कोणताही पर्याय निवडावा लागणार नाही. या प्रवाशांना रेल्वेच्या बाजूने आपोआप लोअर बर्थ मिळेल.

गर्भवती महिलांनाही ही सुविधा मिळते

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिलांसाठी स्लीपर श्रेणीमध्ये 6 लोअर बर्थ राखीव आहेत. यासोबतच 3AC मध्ये प्रत्येक कोचमध्ये चार ते पाच लोअर बर्थ, 2AC मध्ये प्रत्येक डब्यात तीन ते चार लोअर बर्थ ठेवण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेची तरतूद सांगितली

त्यांनी सांगितले की, याशिवाय रेल्वेत लोअर बर्थ खाली असल्यास ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens), दिव्यांगजन आणि महिलांना ऑनबोर्ड टिकट चेकिंग स्टाफद्वारा अप्पर बर्थ देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

59 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले

सरकारने 2019-20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती. त्यांनी सांगितले की, ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सरासरी 53 टक्के सवलत दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांसह सर्व नागरिकांना हे अनुदान दिले जाते. याशिवाय, दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्ण अशा अनेक श्रेणींमध्ये रेल्वे सबसिडी देते.

पूर्वी कोणाला किती सूट मिळायची?

रेल्वेने जारी केलेल्या अहवालानुसार, यापूर्वी रेल्वे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना भाड्यात 40% सवलत देत असे. दुसरीकडे, जर आपण महिलांना दिलेल्या सूटबद्दल बोलायचे झाल्यास, या लोकांना वयाच्या 58 व्या वर्षापासून 50 टक्के सूट मिळत होती. ही सूट मेल, एक्सप्रेस, राजधानीसह सर्व प्रकारच्या ट्रेनमध्ये दिली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT