Indian Railways: राजधानी-शताब्दीने प्रवास करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

Vande Bharat Chair Car: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Ashwini Vaishnaw
Ashwini VaishnawDainik Gomantak

Sleeper Vande Bharat Train: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून वंदे भारत गाड्या वेगवेगळ्या मार्गावर चालवल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसांत मीडिया रिपोर्ट्समध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन धावल्याची बातमी आली होती. आता याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजूरी दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चपर्यंत वंदे भारत ट्रेनमध्ये वंदे चेअर कार, वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर असे तीन फार्मेट असतील.

वंदे भारतचा कमाल वेग 160 किमी प्रतितास आहे

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आगामी काळात वंदे भारत ट्रेन शताब्दी, राजधानी आणि लोकल ट्रेनची जागा घेईल. या स्वदेशी 'सेमी-हाय स्पीड' गाड्या चेन्नईतील (Chennai) इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार केल्या जात आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, येत्या तीन ते चार वर्षात वंदे भारत गाड्यांसाठी जास्तीत जास्त 160 किमी प्रतितास वेगाने रेल्वे ट्रॅक अपग्रेड केले जातील.

Ashwini Vaishnaw
Indian Railways: रेल्वेची करोडो प्रवाशांना मोठी भेट, आता स्लीपर तिकिटावर करता येणार AC कोचमधून प्रवास!

वंदे भारत ट्रेनचे तीन फॉर्मेट असतील

डेहराडून ते दिल्लीच्या (Delhi) आनंद विहार टर्मिनलपर्यंत वंदे भारत सुरु केल्यानंतर अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'वंदे भारत ट्रेनचे तीन फॉर्मेट आहेत.

100 किमीपेक्षा कमी प्रवासासाठी वंदे मेट्रो, 100-550 किमीसाठी वंदे चेअर कार आणि 550 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी वंदे स्लीपर. 2024 मध्ये फेब्रुवारी-मार्चपर्यंत तिन्ही फॉरमॅट तयार होतील. पंतप्रधान मोदींनी दिल्ली-डेहराडून वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.'

प्रत्येक राज्याला वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे

ही ट्रेन धावल्याने डेहराडून-नवी दिल्ली शताब्दी एक्स्प्रेसला लागणारा वेळ 6 तास 10 मिनिटांवरुन 4.5 तासांवर येईल.

वैष्णव म्हणाले की, 'पुढील वर्षी जूनच्या मध्यापर्यंत प्रत्येक राज्याला वंदे भारत ट्रेनची भेट मिळेल. या गाड्यांची बांधणी जलदगतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. दर आठव्या किंवा नवव्या दिवशी एक नवीन ट्रेन तयार होत आहे.'

Ashwini Vaishnaw
Indian Railways: वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी मोठी अपडेट, रेल्वेने आणली खास योजना; आता तुम्हाला...

तसेच, वंदे भारतची रचना कमाल 160 किमी प्रतितास वेगाने करण्यात आली आहे. परंतु ट्रॅकच्या क्षमतेनुसार ती ताशी 130 किलोमीटर वेगाने धावते.

ते पुढे म्हणाले की, 'जुने ट्रॅक ताशी 70 ते 80 किमीच्या वेगाने तयार करण्यात आले होते. 110 किमी प्रतितास, 130 किमी प्रतितास आणि 160 किमी प्रतितास या वेगाने सुमारे 25,000-35,000 किमी ट्रॅक अपग्रेड केले जात आहेत.'

रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 2027-28 पर्यंत वंदे भारत गाड्या ताशी 160 किमी वेगाने धावू शकतील. रेल्वेकडून 4G-5G टॉवर बसवले जात आहेत. ते अनेक ठिकाणी बसवण्यात आले असून हे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com