Railways New Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Indian Railways New Mobile Phone Rules: प्रवासादरम्यान सहप्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने आता कडक पावले उचलली असून, ट्रेनमध्ये मोबाईल फोन वापरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला.

Manish Jadhav

Indian Railways New Mobile Phone Rules: प्रवासादरम्यान सहप्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने आता कडक पावले उचलली असून, ट्रेनमध्ये मोबाईल फोन वापरण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला. रेल्वेने जारी केलेल्या नव्या इशाऱ्यानुसार, आता प्रवाशांना ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलता येणार नाही किंवा स्पीकरवर गाणी आणि व्हिडिओ लावता येणार नाहीत. पूर्व रेल्वेने आपल्या अखत्यारीतील सर्व रेल्वे स्थानकांना या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांनी प्रवासादरम्यान फोन स्पीकर मोडवर ठेवून बोलणे टाळावे, तसेच लांबलचक संभाषण करताना आवाज इतरांना त्रास होणार नाही इतकाच मर्यादित ठेवावा. फोनची रिंगटोन कमी आवाजात ठेवावी अथवा फोन सायलेंट किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवावा, अशी सूचना करण्यात आली. विशेषतः वातानुकूलित डब्यांमध्ये दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने आवाज घुमतो आणि त्यामुळे प्रवाशांच्या (Passengers) झोपेत व्यत्यय येतो. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला.

जर एखाद्या प्रवाशाने मोठ्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार केली, तर संबंधित व्यक्तीवर सुधारित रेल्वे कायदा 1989च्या कलम 145 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये दोषी आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तिकीट तपासनीस किंवा त्यावरील दर्जाच्या रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रकरणी थेट कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले.

या नियमाबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानके आणि डब्यांमध्ये प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजीतून विशेष घोषणा केल्या जाणार आहेत. तसेच, स्थानक परिसर आणि डब्यांमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्यासंबंधीचे स्टिकर्स लावून प्रवाशांना इअरफोन वापरण्याचे आवाहन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

Gurpatwant Singh Pannun Murder Plot: खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, अमेरिकन कोर्टाचा निखिल गुप्ताला झटका; सुनावली 20 वर्षांची शिक्षा

Marigold Farming: काणकोणात झेंडूचा बहर; 1,060 क्विंटल उत्पादन, स्थानिक फुलांना ग्राहकांची पसंती

Vijay Merchant Trophy: विश्राम परबची झुंज व्यर्थ; कर्नाटकाकडून गोव्याचा डाव व 168 धावांनी दणदणीत पराभव

FC Goa: तयारीला वेळ कमी, तरी एफसी गोवा सज्ज; नॉर्थईस्टविरुद्धच्या लढतीसाठी नव्या प्रशिक्षकांचा विश्वास

SCROLL FOR NEXT