टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon musk) यांनी अलीकडेच 44 बिलियनची ट्विटरसोबत (Twitter) मोठी डिल केली आणि ट्विटरची मालकी मिळवली, त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने शुक्रवारी ट्विटरवर एलन मस्कला फूड डिलिव्हरी अॅप स्विगी विकत घेण्यास सांगितले. स्विगीच्या फूड डिलिव्हरीबद्दल शुभमन गिल (Shubman Gill) खूपच नाराज दिसत आहे. फूड डिलीवरीला उशीर झाल्यामुळे त्याने एलन मस्क यांना ही विनंती केली आहे.
ट्विटरसोबत नुकत्याच झालेल्या 44 अब्ज डॉलरच्या करारानंतर एलन मस्क सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. त्यांच्यासंदर्भात मायक्रोब्लॉगिंग साइटवर पोस्टचा पूर आला आहे. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटर शुभमन गिलही सामील झाला आहे. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात टेस्ला प्रमुखांना फूड डिलिव्हरी अॅप स्विगी घेण्याचे आवाहन केले आहे.
शुभमन गिलने ट्विट करून लिहिले, 'एलन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा जेणेकरून ते वेळेवर डिलिव्हरी करू शकतील.' शुभमन गिलने शुक्रवारी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही पोस्ट केली आहे. त्याचवेळी, या पोस्टमध्ये तो स्विगीची तक्रार करत असल्याचेही दिसून आले. स्विगीच्या लेट फूड सर्विसमुळे तो नाराज असल्याचे लतक्षात आले. म्हणून त्याने ही मजेशीर पद्धतीने पोस्ट केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर यूजर्स सतत त्याला कमेंट करत आहे.
शुभमन गिलच्या या पोस्टला 62 हजारांहून अधिक लाईक्स आणि 3 हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. दरम्यान, शुभमन गिलच्या या मुद्द्याशी काही युजर्स अजिबात सहमत नाहीत आणि ते त्यांचे मत व्यक्त करत आहेत. दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यानंतर आता टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचे एक ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. एलन मस्क (Elon Musk) यांनी कोका कोला खरेदी करण्याबाबत ट्विट केले आहे. ट्विटर विकत घेतल्यापासून मस्क सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसते. ते एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत. पुढच्या वेळी कोका-कोला खरेदी करणार असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.