GDP Data Dainik Gomantak
अर्थविश्व

भारताचा विकासरथ सुसाट! GDP ची आकडेवारी आली समोर, पहिल्या तिमाहीत...

India GDP Q1 FY24: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर (GDP) 7.8 टक्के होता. सरकारने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली.

Manish Jadhav

India GDP Q1 FY24: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा विकास दर (GDP) 7.8 टक्के होता. सरकारने गुरुवारी ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी, मार्च तिमाहीत भारताचा विकास दर 6.1% होता. तर गेल्या वर्षी जीडीपी 7.2 टक्के होता.

या दृष्टिकोनातून पाहिल्यास चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरली आहे. मजबूत GDP आकड्यांमध्ये एक प्रमुख योगदान केंद्र आणि राज्य सरकारद्वारे भांडवली खर्च आहे. सरकारने खूप पैसा खर्च केला आहे.

भारताचा विकास दर चीनच्या तुलनेत वेगाने वाढत आहे

NSO ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) वाढीचा दर 13.1 टक्के होता.

यासह, भारत (India) प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. एप्रिल-जून तिमाहीत चीनचा जीडीपी विकास दर 6.3 टक्के होता.

मुख्य क्षेत्राच्या वाढीत घट

मुख्य क्षेत्राच्या वाढीसाठी जुलै महिना चांगला राहिला नाही. जुलैमध्ये त्यात घट झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात मुख्य क्षेत्राचा विकास दर 8 टक्के होता.

वर्षभरापूर्वी याच महिन्यात मुख्य क्षेत्राची वाढ 4.8 टक्के होती. चालू आर्थिक वर्षाच्या जून महिन्यात आठ मूलभूत उद्योगांचा विकास दर 8.3 टक्के होता.

RBI चा अंदाज काय होता?

चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5 टक्के राहील, असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. त्याचवेळी, आरबीआयने (RBI) आपल्या अहवालात पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी 8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

त्याचवेळी, भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर यंदा 6.1 टक्के राहील, असा अंदाज IMFने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT