Indian Economy: GDP बाबत जागतिक बँकेने दिली आनंदाची बातमी, पण महागाईवर...

Indian Economy: दीर्घ काळानंतर भारतासाठी आर्थिक आघाडीवर दिलासा देणारी बातमी आली आहे.
Factory
FactoryDainik Gomantak

Indian Economy: दीर्घ काळानंतर भारतासाठी आर्थिक आघाडीवर दिलासा देणारी बातमी आली आहे. जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.9 टक्क्यांपर्यंत वर्तवला आहे. यापूर्वी हा अंदाज 6.5 टक्के होता. जागतिक बँकेने मंगळवारी जारी केलेल्या भारताशी संबंधित ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिका, युरोप आणि चीनमधील घडामोडींचा प्रभाव भारतावरही दिसून येत आहे. याशिवाय, जागतिक बँकेने पुढील आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा आकडा 7 टक्क्यांवरुन 6.6 टक्क्यांवर आणला आहे.

किरकोळ महागाईवर दिलासा नाही

तथापि, जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सरकार चालू आर्थिक वर्षासाठी 6.4 टक्के वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास जागतिक बँकेने (World Bank) व्यक्त केला आहे. दुसरीकडे, किरकोळ महागाईबाबत जागतिक बँकेच्या अहवालात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 2022-23 या आर्थिक वर्षात किरकोळ चलनवाढ 7.1 टक्के राहील असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. जानेवारी 2022 पासून महागाई (Inflation) सरकारच्या समाधानकारक पातळीच्या वर राहिली आहे.

Factory
Indian Economy: भारत जगातील तिसरी आर्थिक शक्ती होणार, अर्थमंत्री सितारमन यांचे देशासाठी मोठे स्वप्न

व्याजदरात 190 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे

यापूर्वी, सरकारकडून सांगण्यात आले होते की, आशियातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 6.3 टक्के दराने वाढली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात जीडीपीचा आकडा 6.8-7 टक्के असण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आरबीआयने मे महिन्यापासून व्याजदरात 190 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. असे असतानाही महागाई दरात किंचित घट नोंदवण्यात आली आहे.

Factory
Indian Economy: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोलाचा सल्ला

तसेच, जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतावर आर्थिक मंदीचा परिणाम कमी होईल, अशी आशाही जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ धुवर शर्मा म्हणाले की, 'भारतावरील कर्जाच्या स्थिरतेची आम्हाला चिंता नाही. सार्वजनिक कर्जात घट झाली आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com