PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: PM Modi साठी टाळ्या, आजपासून 'या' लोकांना भरावा लागणार नाही आयकर

Income Tax News: मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात अनेक आश्वासने दिली होती, जी सरकारने वर्षभरापूर्वीच पूर्ण केली आहेत.

दैनिक गोमन्तक

Income Tax News: मोदी सरकारने गेल्या अर्थसंकल्पात अनेक आश्वासने दिली होती, जी सरकारने वर्षभरापूर्वीच पूर्ण केली आहेत. 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. सरकारने ITR नियमात मोठा बदल केला आहे. आतापासून काही लोकांना आयकर रिटर्न भरावे लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यांसंबधी घोषणा केली आहे.

अर्थ मंत्रालयाने ट्विट केले आहे

यापुढे 75 वर्षांवरील अशा ज्येष्ठ नागरिकांना (Citizens) आयकर विवरणपत्र भरावे लागणार नाही, अशी घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे फक्त पेन्शन किंवा बँकेचे व्याज आहे, त्यांना आयटीआर भरण्याची गरज नाही. अर्थ मंत्रालयाने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

तुम्हाला कोणत्या कायद्यानुसार लाभ मिळेल?

सरकारने सांगितले आहे की आयकर कायदा, 1961 मध्ये एक नवीन कलम कलम 194P जोडण्यात आले आहे, ज्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळेल.

सीबीडीटीने माहिती दिली

याबाबत माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत अधिसूचना जारी केल्याचे सांगितले. याशिवाय, नियम 31, नियम 31A, फॉर्म 16 आणि 24Q मध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत.

अनेक आश्वासने दिली

कर सवलतींसाठी मॅन्युफॅक्चरिंग सुरु करण्याची अंतिम तारीख 1 वर्षाने वाढवण्यात आली आहे. आता त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 करण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा, नागरिकांच्या उत्पन्नावर कराच्या तरतुदींसह, अनेक सवलती आणि सूट देखील प्रदान करतो. याच सवलतींमुळे करदात्यांनाही मोठा दिलासा मिळतो. हे लक्षात घेऊन 2018 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने (Modi Government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT