Updated Income Tax Returns: तुम्हीही आयकर भरणारे असाल तर तुमच्यासाठी सरकारने नवीन नियम जारी केला आहे. सरकारने जारी केलेला हा नियम वाचून तुम्हालाही आनंद होईल. अर्थ मंत्रालयाने एक नवीन आदेश जारी केला आहे. आर्थिक वर्ष 2020 (FY20) किंवा मूल्यांकन वर्ष (AY 2020-2021) साठी अद्यावत प्राप्तिकर रिटर्न (ITR-U) भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन ITR भरण्याची सुविधा 2022 च्या फायनान्स अॅक्टपासून सुरु करण्यात आली आहे. याला अपडेटेड रिटर्न म्हणतात.
तुमच्या आयकर रिटर्नमध्ये काही बदल असल्यास, तुम्ही ते 31 मार्च 2023 पर्यंत सबमिट करु शकता. यासाठी, आयकर कायद्याच्या कलम 139 मध्ये नवीन उपकलम 8(A) जोडण्यात आले आहे. 1 एप्रिल 2022 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत तुम्ही दोन वर्षांच्या आत ITR अपडेट करु शकता. पण जेव्हा करदात्याने मूळ रिटर्न भरताना किंवा उशीर झालेला रिटर्न भरताना उत्पन्नाशी संबंधित माहिती देण्यामध्ये चूक केली असेल तेव्हा हे त्याच बाबतीत लागू होईल.
या संदर्भात सीएनकेचे पल्लव प्रद्युम्न नारंग म्हणाले की, 'दोन वर्षांची कालमर्यादा तुम्ही ज्या वर्षापासून मूळ रिटर्न भरला होता त्या वर्षापासून मोजला जाईल. म्हणजेच, 31 मार्च 2021 पर्यंत, 31 मार्च 2023 पर्यंत रिटर्न भरता येईल. जर तुम्हाला अपडेटेड रिटर्न भरायचे असेल तर तुमच्याकडे 90 दिवसांपेक्षा कमी कालावधी आहे. जेव्हा रिटर्नमध्ये अतिरिक्त उत्पन्नाचा खुलासा केला असेल तेव्हाच अद्ययावत विवरणपत्र दाखल केले जाऊ शकते.'
वास्तविक, अद्ययावत रिटर्नची सुविधा केवळ त्यांच्यासाठीच आहे, जे त्यांच्या रिटर्नमध्ये अतिरिक्त उत्पन्न घोषित करण्यास इच्छुक आहेत. यापूर्वी ते कोणत्याही कारणास्तव ते उत्पन्न (Income) उघड करु शकत नव्हते किंवा इतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करु इच्छित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.