Sri Lanka next week Ban trading stock market  Dainik Gomantak
अर्थविश्व

जम्बो विकेंड! श्रीलंकेचा पाय खोलात; आठवड्याभरासाठी शेअर बाजारात व्यवहारावर बंदी

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेने पुढील आठवड्यात शेअर बाजार बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेने (Sri Lanka) पुढील आठवड्यात शेअर बाजार बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोलंबो स्टॉक एक्सचेंज, श्रीलंकेचा शेअर बाजार येत्या आठवड्यातही बंद राहणार आहे. श्रीलंका सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात ही घोषणा केली आहे. (In Sri Lanka for the next week Ban on trading in the stock market)

बाजार का बंद राहतील?

गुंतवणूकदारांना बाजाराबद्दल अधिक स्पष्टता आणि समज निर्माण करण्याची संधी देण्यासाठी सोमवार ते शुक्रवार कोलंबो स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला, असल्याचे म्हटले आहे. या घोषणेचा अर्थ असा आहे की 18 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत कोलंबो शेअर बाजारातील व्यवहार तात्पुरते बंद केले जाणार आहेत.

संचालक मंडळाने विनंती केली कोलंबो स्टॉक एक्सचेंजच्या संचालक मंडळाने एक दिवस आधी व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याची विनंती SEC ला केली होती, मात्र त्यासाठी श्रीलंकेच्या सध्याच्या परिस्थितीचा हवाला देण्यात आला होता.

दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, गेल्या काही आठवड्यांपासून श्रीलंकेत प्रचंड आर्थिक संकट आणि त्यानंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन एसईसीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंकेमध्ये इंधन आणि दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या परकीय चलनाची तीव्र कमतरता भासत आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, श्रीलंकन ​​सरकारने परदेशी कर्जाची परतफेड पुढे ढकलली आहे.

आर्थिक संकट अधिक गडद होत असताना, देशभरातील सरकारविरोधी निदर्शनेही तीव्र होताना दिसत आहेत. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

SCROLL FOR NEXT