Hyundai Venue Dainik Gomantak
अर्थविश्व

Hyundai Upcoming Car: ह्युंदाई करणार गर्दा! 'या' 3 कार्स नव्या अवतारात होणार लॉन्च; मारुतीशी असणार स्पर्धा थेट

Hyundai New Car Launch 2025: ह्युंदाई ऑक्टोबर 2025 च्या सुमारास भारतात त्यांची नवीन व्हेन्यू एसयूव्ही लॉन्च करु शकते. त्याची झलक नुकतीच चाचणी दरम्यान दिसून आली. त्याच्या डिझाइनमध्ये मोठा बदल होईल, जो मोठ्या प्रमाणात क्रेटापासून प्रेरित असेल.

Manish Jadhav

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय ऑटो मार्केटमध्ये ह्युंदाईची स्थिती फारशी चांगली नाही. बऱ्याच काळापासून देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार कंपनी असलेली ह्युंदाई मे 2025 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. कंपनीच्या बहुतेक कार आता कमी विकल्या जात आहेत. केवळ क्रेटा एसयूव्ही चांगली कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत, येत्या काही महिन्यांत लॉन्च होणाऱ्या त्यांच्या तीन नवीन कारकडून ह्युंदाईला मोठ्या आशा आहेत.

1. नवी जनरेशन Hyundai Venue

दरम्यान, ह्युंदाई ऑक्टोबर 2025 च्या सुमारास भारतात त्यांची नवीन व्हेन्यू एसयूव्ही लॉन्च करु शकते. त्याची झलक नुकतीच चाचणी दरम्यान दिसून आली. त्याच्या डिझाइनमध्ये मोठा बदल होईल, जो मोठ्या प्रमाणात क्रेटापासून प्रेरित असेल. नवीन व्हेन्यूमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ, नवीन 16-इंच अलॉय व्हील्स आणि चारही चाकांमध्ये डिस्क ब्रेक मिळू शकतात. सुरक्षिततेसाठी यात लेव्हल 2 एडीएएस तंत्रज्ञान दिले जाईल, तर सध्याच्या मॉडेलमध्ये फक्त लेव्हल 1 एडीएएस आहे. यात सध्याच्या मॉडेलमध्ये दिलेली पेट्रोल (Petrol) आणि डिझेल इंजिने असतील.

2. Hyundai Ioniq 5 फेसलिफ्ट

आयोनिक 5 ही एक इलेक्ट्रिक कार आहे, जी दोन वर्षांपूर्वी भारतात लॉन्च झाली होती. आता तिचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी सुरु आहे. या कारमध्ये नवीन डिझाइन, अधिक फिजिकल बटणे आणि नवीन 3-स्पोक स्टीअरिंग व्हील असेल. यात 84 किलोवॅट प्रति तासाची मोठी बॅटरी असेल, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमीपेक्षा जास्त रेंज देईल. याशिवाय, 8 एअरबॅग्ज, लेव्हल 2 एडीएएस, ओव्हर-द-एअर (ओटीए) अपडेट्स आणि डिजिटल की सारखी फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील. अलीकडेच ही कार भारतात (India) चाचणी दरम्यान दिसली.

3. Hyundai Verna फेसलिफ्ट

ह्युंदाई त्यांच्या व्हर्ना सेडानचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील आणणार आहे. 2025 च्या अखेरीस ही कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते. ही कार किरकोळ कॉस्मेटिक बदलांसह सादर केली जाईल. तिचे इंटीरियर देखील नवीन आणि अत्याधुनिक फीचर्ससह अपडेट केले जाईल. इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT