
ह्युंदाईने मोठा धमाका केला. ह्युंदाईने त्यांच्या लोकप्रिय सेडान कार व्हर्नाचे परवडणारे मॉडेल SX+ लॉन्च केले. ग्राहकांना या परवडणाऱ्या मॉडेलमध्ये कारचे सर्व आवश्यक फीचर्स मिळतील. आतापर्यंत व्हर्नाचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल SX होते. आता किंमत थोडी वाढवून SX+ च्या फीचर्समध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा अर्थ ग्राहकांना परवडणाऱ्या मॉडेलमध्ये कारच्या सर्व फीचर्सचा आनंद घेता येईल.
दरम्यान, SX+ ही कार 2 ट्रान्समिशन ऑप्शनसह लॉन्च करण्यात आली. मॅन्युअल आणि iVT चा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आला. खास गोष्ट म्हणजे या परवडणाऱ्या व्हेरिएंटमध्ये 8-स्पीकर बोस ऑडिओ, कारमध्ये पुढे बसणाऱ्या प्रवाशांसाठी हवेशीर सीट्स, लेदर सीट अपहोल्स्ट्री, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि एलईडी हेडलॅम्प यांचा समावेश आहे.
ह्युंदाई व्हर्नाच्या SX+ मॉडेलच्या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 13.79 लाख रुपये एक्स-शोरुम पासून सुरु होते. तसेच iVT व्हेरिएंटची किंमत 15.04 लाख रुपये एक्स-शोरुम पासून सुरु होते. याशिवाय, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार (Car) उत्पादक कंपनी ह्युंदाई व्हर्नासह एक नवीन वायरलेस अॅडॉप्टर देखील देत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते कोणत्याही केबलला जोडल्याशिवाय कारमध्ये Apple CarPlay किंवा Android Auto वापरु शकतात. यामुळे नेव्हिगेशन, म्युझिक प्लेबॅक आणि हँड्स-फ्री नियंत्रण सोपे होते.
ह्युंदाई व्हर्न ही एक लोकप्रिय सेडान कार आहे, जी अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तिच्या बेस मॉडेलची किंमत 11.07 लाख पासून सुरु होते आणि टॉप मॉडेलची किंमत 17.55 लाखांपर्यंत जाते. ही 5 सीटर सेडान आहे, ज्यामध्ये 1482 ते 1497 सीसी आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे इंजिन ऑप्शन आहेत. ही शानदार कार 10 कलरमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलसह व्हर्नाला 18.6 ते 20.6 किमी प्रति लिटर मायलेज मिळू शकते.
ह्युंदाई व्हर्नाची रचना खूपच आकर्षक आणि आधुनिक आहे. ती प्रीमियम आणि आलिशान अपील देण्यासाठी डिझाइन केलेली आहे, विशेषतः मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी उत्कृष्ट लेगरुम आणि नी रुम आहे. ह्युंदाई व्हर्नाची मुख्य स्पर्धा मारुती सुझुकी सियाझ, होंडा सिटी, फोक्सवॅगन व्हर्टस आणि स्कोडा स्लाव्हिया यांच्याशी आहे. किंमत, वैशिष्ट्ये आणि कामगिरीच्या आधारावर व्हर्नाची या कारशी स्पर्धा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.