HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC बँकेने लाखो ग्राहकांना दिली मोठी भेट, मार्च 2023 पर्यंत मिळणार मोठा फायदा

Special FD Rates: देशातील लाखो ग्राहकांना HDFC बँकेने मोठी भेट दिली आहे.

दैनिक गोमन्तक

HDFC Bank Special FD Rates: देशातील लाखो ग्राहकांना HDFC बँकेने मोठी भेट दिली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विशेष एफडीची सुविधा मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच, आता ग्राहक पुढील वर्षी मार्चपर्यंत या विशेष एफडीचा लाभ घेऊ शकतात. बँकेने अधिसूचना जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.

31 मार्चपर्यंत लाभ मिळेल

एचडीएफसी (HDFC) बँकेने सीनियर सिटीझन केअर एफडी योजना सुरु केली होती. ही योजना डिसेंबर 2022 मध्ये संपत होती, परंतु आता सरकारने ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. या FD योजनेत ग्राहकांना अधिक व्याजाचा लाभ मिळेल.

0.75 टक्के अधिक व्याज मिळत आहे

या योजनेत बँकेला 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. हा व्याजदर सामान्य नागरिकांच्या तुलनेत 0.75 टक्के जास्त आहे. बँकेने (Bank) 18 मे 2020 रोजी ही सुविधा सुरु केली. 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत 5 वर्षांच्या मुदतीच्या FD मध्ये, ग्राहकांना 5.75 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 75 टक्के अतिरिक्त व्याज म्हणजेच 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.

अनेक बँका एफडी सुविधा देत आहेत

एचडीएफसी बँकेशिवाय, आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि एसबीआयसह अनेक बँका ग्राहकांना विशेष एफडी सुविधा देत आहेत. बँकांनी ही सुविधा कोरोना काळात सुरु केली आणि नंतर सर्व बँकांनी ही सुविधा वाढवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

SCROLL FOR NEXT