Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: 'या' भाजपशासित सरकारची मोठी घोषणा, DA मध्ये केली वाढ; पगार आता...

DA Hike: प्रत्येक सरकारी कर्मचारी डीए वाढण्याची वाट पाहत आहे. यातच सरकारने डीएमध्ये वाढ केली आहे.

Manish Jadhav

DA Hike: प्रत्येक सरकारी कर्मचारी डीए वाढण्याची वाट पाहत आहे. यातच सरकारने डीएमध्ये वाढ केली आहे. डीए वाढल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही वाढतो आणि त्यांना वाढीव पैसे मिळतात.

वास्तविक, आता हरियाणा सरकारने डीए वाढवला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार काढणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणा सरकारने महागाई भत्ता (DA) वाढवला आहे.

डीए वाढला

हरियाणा सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार काढणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्के वाढ जाहीर केली आहे.

हरियाणा (Haryana) सरकारच्या वित्त विभागानेही याबाबत आदेश जारी केला आहे. विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, मूळ वेतनावरील डीए सध्याच्या 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे. हे 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल.

हरियाणा

यासोबतच, आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employees) पगारातही वाढ होणार असून वाढीव पगार येणार आहे. आदेशानुसार वाढीव डीए एप्रिलच्या पगारासह देण्यात येईल आणि जानेवारी ते मार्च 2023 ची थकबाकी मे महिन्यात दिली जाईल.

यासोबतच राज्य सरकारकडून डीआरमध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

DR पण वाढला

दुसर्‍या आदेशात, वित्त विभागाने म्हटले आहे की, राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगांतर्गत पेन्शनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना देण्यात येणाऱ्या महागाई रिलीफ (DR) मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली आहे.

सध्याच्या मूळ पेन्शन/कौटुंबिक निवृत्ती वेतनाच्या 38 टक्क्यांवरुन 42 टक्के डीआर देखील वाढवण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. हे देखील 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; घराबाहेर आले...पोलिस घेऊन गेले...!

Naru In Goa: गोमंतकीयांसाठी धोक्याची घंटा! गोव्यात आढळला खतरनाक 'नारू'; खांडेपार, कुर्टी येथे सापडला जंतू

Tragic Death: काळीज पिळवटले! खेळता खेळता पडला विहिरीत, मृत्यूशी दिली झुंज; 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Zenito Cardozo Case: शिरदोन गँगवॉर प्रकरण! जेनिटोला ‘सुप्रीम’ दिलासा; 3 वर्षांच्या शिक्षेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

SCROLL FOR NEXT