GST  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत 'या' मोठ्या निर्णयावर होणार शिक्कामोर्तब, 11 जुलै रोजी...

GST Council Meeting: जीएसटी परिषदेची 50 वी बैठक 11 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे.

Manish Jadhav

GST Council Meeting: जीएसटी परिषदेची 50 वी बैठक 11 जुलै रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे. जीएसटी परिषदेने ट्विट केले की, जीएसटी परिषदेची 50 वी बैठक 11 जुलै 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेत राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असणार आहे. माहितीनुसार, बनावट नोंदणी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचे क्लेम रोखण्यासाठी परिषद कठोर पावले उचलू शकते.

याशिवाय, परिषद ऑनलाइन गेमिंग, कसिनो आणि होर्सरेसवरील GOM अहवालावर चर्चा करेल.

बनावट नोंदणी ही सर्वात मोठी समस्या असेल

दरम्यान, GST अंतर्गत नोंदणीकृत बनावट कंपन्या आणि व्यावसायिकांवर कारवाई करणे, बनावट ITC क्लेम रोखणे आणि सर्व कंपन्यांसाठी एड्रेस जिओटॅगिंग अनिवार्य करणे यासाठी काम सुरु आहे.

देशाची राजधानी दिल्ली आणि हरियाणामध्येही (Haryana) त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु झाला आहे. त्याचा वापर कोणत्याही व्यवसायाच्या ठिकाणाची पडताळणी करण्यास मदत करेल.

खरे तर, अशी काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात एड्रेस बनावट असल्याचे समोर आले आहे. पडताळणी दरम्यान, 12500 बनावट कंपन्या आढळून आल्या आहेत, ज्यांचे जागेवर कार्यालयही नाही.

त्याचवेळी, रिस्की कंपन्यांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील आवश्यक असेल. सध्या, प्रमाणीकरण केवळ आधार आणि पॅनद्वारे ओटीपी आधारित आहे.

नोव्हेंबर 2020 पासून विशेष मोहिमेत, केंद्रीय एजन्सींनी 62,000 कोटी रुपयांचे बोगस ITC क्लेम शोधून काढले आहेत आणि व्यावसायिकांसह 776 लोकांना अटक केली आहे.

ऑनलाइन गेमिंगवरही चर्चा होईल

ऑनलाइन गेमिंग, कसिनो आणि होर्सरेसवरील GOM अहवालावरही परिषद चर्चा करेल आणि लवकरच तो राज्यांना पाठवेल. जीओएमने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये परिषदेला आपला अहवाल सादर केला, परंतु परिषदेने तो चर्चेसाठी घेतला नाही.

जीएसटी न्यायाधिकरणावर चर्चा केली जाईल

जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात आहे, यावरही परिषदेच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. हे न्यायाधिकरण अप्रत्यक्ष कर खटल्यांचे ओझे कमी करु शकते.

जीएसटी कौन्सिलच्या मंजुरीनंतर केंद्र लवकरच सदस्यांची नियुक्ती करेल. सध्या टॅक्स अधिकाऱ्यांच्या निर्णयावर असमाधानी असलेले करदाते संबंधित उच्च न्यायालयात (High Court) जातात. त्यानंतर ठराव प्रक्रियेलाही बराच वेळ लागतो आणि त्यांच्याकडे जीएसटी प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष खंडपीठही नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT