Government will launch WAPCOS Limited and National Seeds Corporation's IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

सरकार आता या बड्या कंपनीचा IPO द्वारे करणार लिलाव

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आयपीओद्वारे (IPO) डब्ल्यूएपीसीओएसमधील 25 टक्के भागविक्रीसाठी रजिस्ट्रार आणि जाहिरात एजन्सीच्या नियुक्तीसाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढली होती.

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी वैपकॉस लिमिटेडचा (WAPCOS Limited) IPO पुढील वर्षी मार्च अखेरीस येऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली असून गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आयपीओद्वारे डब्ल्यूएपीसीओएसमधील 25 टक्के भागविक्रीसाठी रजिस्ट्रार आणि जाहिरात एजन्सीच्या नियुक्तीसाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा काढली होती.(Government will launch WAPCOS Limited and National Seeds Corporation's IPO)

जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Drinking Water and Sanitation) वैपकॉस ही कंपनी पाणी, वीज आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना सल्ला, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम सेवा प्रदान करते. कंपनी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि इतर देशांनाही आपल्या सेवा पुरवते. अधिकाऱ्याने सांगितले की महामारीमुळे IPO मध्ये काही विलंब झाला आहे. कंपनी आपल्या परदेशातील कामकाजासाठी डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्हाला आशा आहे की मूल्यांकनाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल.

राष्ट्रीय बीज महामंडळाचाही IPO

याशिवाय, सरकार IPO द्वारे राष्ट्रीय बियाणे महामंडळातील (National Seeds Corporation) आपला 25 टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे. या भागविक्रीसाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी सरकारने बोली देखील मागविल्या आहेत.

1.75 लाख कोटी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य

सरकारने 2021-22 मध्ये निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत सरकारने एक्सिस बैंक बँक, एनएमडीसी लिमिटेड आणि हडको मधील भागविक्रीद्वारे 8,300 कोटी रुपये उभारले आहेत.

या कंपन्यांचे होणार निर्गुंतवणूक

सरकारने चालू आर्थिक वर्षात एअर इंडिया, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पवन हंस, बीईएमएल आणि निलांचल इस्पात निगम लिमिटेड यांच्या निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय सरकार जीवन विमा महामंडळाचासुद्धा IPO आणणार आहे.

तर दुसरीकडे एलआयसी आयपीओबाबतहि (LIC IPO) सरकार वेगाने पावले उचलत आहे. सरकारने आयपीओसंदर्भात कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्यासाठी अर्ज (आरएफपी) आमंत्रित केले आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकारला IPO मधून 80,000 कोटी रुपये मिळू शकतात, ज्याचे मूल्य 10-15 लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते.एलआयसीच्या आयपीओचे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आयपीओ म्हणून वर्णन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT