Startup साठी स्वित्झर्लंड बनतयं भारतीयांच्या आकर्षणाचे केंद्र

यासाठी स्वित्झर्लंडने (Switzerland) जागतिक स्तरावर अनेक स्पर्धात्मक पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे.
Startup
StartupDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय उद्योजक (Indian Entrepreneurs) मोठ्या संख्येने स्वित्झर्लंडच्या (Switzerland) स्टार्टअप (Startup) इकोसिस्टमचा लाभ घेण्याचा आणि तिथे त्यांचे नवीन उद्योग सुरु करण्याची तयारी करत आहेत. त्याचबरोबर हा पर्वतीय देश स्टार्टअप्ससाठी स्वतःला पसंतीचे स्थान म्हणून सादर करत आहे. यासाठी स्वित्झर्लंडने जागतिक स्तरावर अनेक स्पर्धात्मक पावले उचलण्यास सुरुवातही केली आहे.

स्विस सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, युरोपियन देशांची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था फेडरल कौन्सिलने (Federal Council) आर्थिक व्यवहार, शिक्षण आणि संशोधन विभागाला (EAER) स्वित्झर्लंडच्या स्टार्टअप इकोसिस्टमचा आढावा घेण्यास सांगितले होते. या पुनरावलोकनात हे तथ्य उघड झाले की, स्वित्झर्लंडची इकोसिस्टम चांगल्या स्थितीत आहे, जरी अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणेची आवश्यकता असली तरी यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण, आंतरराष्ट्रीयकरण, कुशल श्रम आणि वित्तपुरवठ्याचा समावेश आवश्यत आहे.

Startup
आता फेसबुक देणार स्टार्टअप कंपन्यांना 50 लाखापर्यंत कर्ज

फेडरल कौन्सिलने आता EAER आणि FDJP ला या क्षेत्रातील पुढील उपायांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यांचे निष्कर्ष जून 2022 मध्ये सादर केले जाऊ शकतात. स्विस सरकारने म्हटले आहे की, देशातील नावीन्यपूर्ण शक्तीमध्ये स्टार्टअप कंपन्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने पुढे म्हटले आहे की, स्टार्टअप कंपन्यांनी नवीतम क्षमता वापरण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Startup
‘स्टार्टअप’च्या माध्यमातून हेरंब बनला यशस्‍वी कार वॉश व्यावसायिक

स्टार्टअप मार्गाने पुढे जाण्याची इच्छा असलेल्या उद्योजकांसाठी भारत हे एक प्रमुख केंद्र बनले आहे. उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्वित्झर्लंड हे भारतीयांसाठी एक प्रमुख स्थान असू शकते जे जागतिक आर्थिक केंद्रात आपले नवीन उपक्रम उभारु इच्छितात. अनेक गुंतवणूक बँकर्स आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर संस्थांनी म्हटले आहे की, भारतातील अनेक उद्योजकांनी स्टार्टअपसाठी स्वित्झर्लंड पोषक आहे का नाही ते पाहावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com