Ration Card Dainik Gomantak
अर्थविश्व

PM किसान अन् रेशन कार्डच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ, सरकारने पाठवली वसुलीची नोटीस

अनेक राज्यांमध्ये सरकारकडून अपात्र शिधापत्रिकाधारकांविरोधात मोहीम राबवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Ration Card Update: तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्या उपयोगाची आहे. यूपी, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये सरकारकडून अपात्र शिधापत्रिकाधारकांविरोधात मोहीम राबवली जात आहे. अपात्र असूनही अनेक वर्षांपासून गरिबांच्या हक्कावर दरोडा घालणाऱ्या अशा लोकांना अखेरच्या काळात अंत्योदय कार्ड व रेशनकार्ड जमा करण्यास सांगितले होते.

30 मे पर्यंत शिधापत्रिका जमा करण्याचा इशारा

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने अपात्र शिधापत्रिकाधारकांना 30 मे पर्यंत शिधापत्रिका सरेंडर करण्याचा इशारा दिला होता. तसेच किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांनाही रक्कम परत करण्याचे सांगण्यात आले. या मोहिमेनंतर, बरेली, ललितपूर, जालौन, लखीमपूर, गाझियाबाद आणि बरेली जिल्ह्यात दररोज हजारो अपात्र लोक आपली शिधापत्रिका जमा करत आहेत.

अपात्रांना वसुलीच्या नोटिसा पाठवल्या

परंतु काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने किसान सन्मान निधी आणि शिधापत्रिकांसाठी अपात्रांना वसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हापूर, यूपीच्या गड तहसीलमध्ये, अनेक अपात्र शेतकरी आणि शिधापत्रिकाधारकांना कृषी उपसंचालक, हापूर यांच्या कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये सन्मान निधीची रक्कम अपात्र शेतकऱ्यांना परत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोण अपात्र शेतकरी आहेत

अशा लाभार्थ्यांचा समावेश अपात्र शेतकऱ्यांमध्ये होतो, जे आयकर भरतात किंवा सरकारी नोकरीत असतात. यासोबतच अनेक ठिकाणी पती-पत्नी दोघेही शेतकरी सन्मान निधीचा फायदा घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा लाभार्थ्यांना किसान सन्मान निधीची आतापर्यंत मिळालेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्याची पावती उपकृषि संचालक कार्यालय, हापूर येथे जमा करावी. असे करण्यात अयशस्वी झाल्यास रक्कम वसूल करण्याचे आदेश जारी केले जातील. अपात्र शिधापत्रिकाधारकांना प्रशासनाकडून नोटीसही पाठवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT