Ration Card Update: मोबाईल नंबर बदलला असेल तर 'असे' करा अपडेट

Ration Card: देशात करोडो लोक रेशन कार्डचा लाभ घेतात
Ration Card Update
Ration Card UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

देशात करोडो लोक रेशन कार्डचा लाभ घेतात. सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन जसे गहू, तांदूळ, डाळी, मीठ इत्यादी अनेक गोष्टी देते. कोरोना (Corona) युगाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 2022 च्या माध्यमातून 80 कोटी लोकांना मोफत रेशन सुविधा पुरवत आहे. सरकारने ही योजना सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे अत्यंत गरजचे आहे. (Ration Card Update News)

यासोबतच रेशन कार्ड (Ration Card) हा एक महत्त्वाचा ओळखपत्र आहे. ते नेहमी अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. रेशनकार्ड बनवताना अनेक वेळा आपला मोबाईल नंबर वेगळा राहतो. पण, नंतर त्यात बदल होतो. अपडेटेड मोबाईल नंबरशिवाय, तुम्हाला रेशन घेताना त्रास होऊ शकतो. यामुळे मोबाईल नंबर बदलल्यानंतर तो लवकरात लवकर अपडेट करा. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला रेशन कार्ड कसे अपडेट करायचे .

  • रेशन कार्डमध्‍ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा -

  • जर तुम्ही दिल्लीत रहात असाल, तर राज्याच्या रेशन कार्ड वेबसाइट https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx वर क्लिक करा.

  • यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करा

  • येथे तुम्ही तुमची सर्व माहिती भरा.

  • नंतर , रेशन कार्ड होल्डरचा आधार क्रमांक (आधार कार्ड) टाका.

  • नंतर , तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर देखील टाकावा लागेल.

  • यानंतर रेशन कार्ड होल्डरचे नावही टाकावे लागेल.

  • यानंतर, शेवटी तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका.

  • त्यानंतर सबमिट करा. तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.

Ration Card Update
सेन्सेक्स 400 अंकांनी, तर निफ्टी 16,300 अंकानी वधारला; TC, Bharti Airtel, फोकसमध्ये

* वन नेशन-वन रेशन कार्ड योजनेचा लाभ लोकांना मिळाला
कोरोना काळात कामगार लोकाना रेशन कार्ड काढताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारने ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली . या योजनेद्वारे देशाच्या कोणत्या कोपऱ्यात तुम्हाला तुमच्या रेशनकार्डद्वारे मोफत रेशनची सुविधा मिळू शकते. या योजनेच्या माध्यमातून सरकारने राशन कार्डला आधार कार्डशी लिंक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com