ev policy plans  Dainik gomantak
अर्थविश्व

इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी, 5 वर्षांसाठी रोड टॅक्समध्येही सूट

उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे म्हणून गोव्यात पाच वर्षांसाठी नोंदणीकृत ई-वाहनांच्या सर्व प्रकारच्या रोड टॅक्समध्ये मिळणार सूट

दैनिक गोमन्तक

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी शनिवारी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा इलेक्ट्रिसिटी मोबिलिटी प्रमोशन पॉलिसी-2021 लाँच केले. गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत सावंत यांनी हे धोरण सादर केले.

इलेक्ट्रिक (Electric) वाहनांच्या खरेदीवर सबसिडी मिळणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले, या धोरणाचा मुख्य उद्देश बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि राज्यातील लोकांना रोजगार निर्मिती करणे हा आहे. धोरणांतर्गत मिळणाऱ्या लाभांबाबत ते म्हणाले, "आम्ही उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देत आहोत. गोव्यात (goa) पाच वर्षांसाठी नोंदणीकृत ई-वाहनांच्या सर्व प्रकारच्या रोड टॅक्समध्ये (tax) सूट देणार आहोत.

महामार्गावर प्रत्येक 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. राज्य सरकार (Government) ई-वाहने खरेदी करणाऱ्यांना सबसिडी देईल आणि चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन असणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Waste Management Project: गोव्यातील दोन कचरा प्रकल्प रखडले! बायंगिणीला कोर्टाचा अडथळा, वेर्णाला पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT