इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा डिचोली पालिकेला मिळाला मान

इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणण्याचा पहिला मान डिचोली पालिकेला मिळाला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा डिचोली पालिकेला मिळाला मान
Dainik Gomantak

डिचोली: इलेक्ट्रिक वाहनांची (Electric vehicles) संकल्पना प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणण्याचा पहिला मान डिचोली पालिकेला मिळाला आहे. पालिका प्रशासन खात्यातर्फे डिचोली (Bicholim) पालिकेला प्रत्येकी 16 लाख मिळून 32 लाख रुपये किमतीच्या दोन 'इलेक्ट्रिक' मोटारी (Electric car) देण्यात आल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ही दोन्ही वाहने (Vehicles) पालिकेच्या ताब्यात आली आहेत.

वाहने पालिकेत पोचताच नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि अन्य नगरसेवकांनी त्यांचे पूजन केले. यावेळी नगरसेवक विजयकुमार नाटेकर,रियाज बेग, सुदन गोवेकर, निलेश टोपले, अनिकेत चणेकर, ऍड. अपर्णा फोगेरी, ऍड. रंजना वायंगणकर, दीपा शिरगावकर, दीपा पळ आदी उपस्थित होते.

इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा डिचोली पालिकेला मिळाला मान
दुरुस्तीनंतर हॉस्पिसियो रुग्णालय पुन्हा आरोग्य सेवेसाठी सज्ज

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल साहजिकच पैशांची बचत तर होणारच आहे. त्याचबरोबर धूर प्रदूषणाचा धोका नाही. असे नगराध्यक्ष फळारी यांनी सांगून जनतेने इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडावा. असे आवाहन त्यांनी केले. पालिकेला दोन मोटरी मिळवून दिल्याबद्दल पालिकेने पालिका प्रशासन खात्याचे सचिव डॉ. तारिक थॉमस, संचालक गुरूदास पिळर्णकर आणि अन्य अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com